Ramdas Athawale : लोकसभेच्या जागावाटपावरून रामदास आठवलेंनी केले मोठे विधान

देशात सध्या लोकसभा निवणुकीचे वारे वाहत आहेत. अशातच पुढच्या काही दिवसांमध्ये आचारसंहिता लागू होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी एक मोठे विधान केले आहे.

195
Ramdas Athawale : लोकसभेच्या जागावाटपावरून रामदास आठवलेंनी केले मोठे विधान

लोकसभेच्या (loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आघाडीमध्ये बैठकांचं सत्र सुरु आहे. वेगवेगळ्या पक्षांकडून वेगवेगळ्या मतदारसंघावर दावा केला जातोय. असं असताना (Ramdas Athawale) केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महायुतीकडे शिर्डी लोकसभेची जागा मागितली आहे.

(हेही वाचा – Shiv Jayanti 2024 : गडकोट, किल्ले हा आपला ठेवा; तो जपण्याचे काम करू- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

… तर आपल्याला तोंड लपवायला जागा उरणार नाही

रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी रविवार १८ फेब्रुवारी रोजी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना आपली इच्छा बोलून दाखवली. तसेच महायुतीने त्यांच्या आरपीआय पक्षाला एकही जागा दिली नाही, तर आपल्याला तोंड लपवायला जागा उरणार नाही, असं मोठं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे.

काय म्हणाले रामदास आठवले ?

भाजपने आणि एकूणच आमच्या एनडीएने “अब की बार ४०० पार” ही घोषणा दिली आहे. त्यामध्ये आमच्या ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’चे सुद्धा मोठे योगदान आहे. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की, महायुतीने मला शिर्डी लोकसभा निवडणुक लढवू द्यावी. मी स्वतः शिर्डी लोकसभा मधून दोन वेळा खासदार झालो आहे. तिसऱ्यांदा मला हार पत्करावी लागली. पण मला परत आता शिर्डी लोकसभा निवडणुक लढवायची आहे. मी सध्या राज्यसभेत असलो तरी मी लोकसभेचा माणूस आहे. मला लोकसभेत येण्याची इच्छा आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितले. आता आठवलेंच्या या प्रस्तावावर भाजप काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल. (Ramdas Athawale)

(हेही वाचा – Shivjayanti 2024 : व्हिडीओ शेअर करून पंतप्रधानांनी दिल्या शिवजयंतीच्या शुभेच्छा)

आमच्यामुळे भाजपला एससी मतं मिळू लागली – रामदास आठवले

भाजपा आणि मित्रपक्षांची जी काही महायुती झाली, ती काही फक्त अजित पवार गट सामील झाला म्हणून नव्हे, तर आम्हीसुद्धा भाजप मध्ये आहोत म्हणून झाली. भाजपाच्या मित्रपक्षांनाही आंबेडकरवादी मतं पूर्वी मिळत नव्हती. पण आम्ही जेव्हा भाजपाच्या सोबत युती केली तेव्हा 2012 पासून SC मतं भाजपाला मिळू लागली आहेत, असा दावा रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केला.

रामदास आठवले आणि जे पी नड्डा यांची भेट –

अशातच रिपब्लिकन पक्षाचे (Ramdas Athawale) राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची १० फेब्रुवारी रोजी भेट घेतली होती.

(हेही वाचा – Farmer Protest : केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना तीन पिकांच्या हमीभावाचा प्रस्ताव; काय म्हणाले शेतकरी?)

लोकसभेच्या दोन जागा रिपब्लिकन पक्षाला मिळाव्या –

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा लाभलेला रिपब्लिकन (Ramdas Athawale) पक्ष नोंदणीकृत पक्ष आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाच्या दोन जागा निवडून आल्यास रिपब्लिकन पक्षाला अधिकृत निवडणूक चिन्ह मिळून तो मान्यताप्राप्त पक्ष होईल. त्यामुळे महाराष्ट्रात शिर्डी आणि आणखी एक जागा अशा दोन लोकसभेच्या जागा रिपब्लिकन पक्षाला मिळाव्यात ही रिपब्लिकन पक्षाची (Ramdas Athawale) मागणी घेऊन आठवले (Ramdas Athawale) यांनी नड्डा यांची भेट घेतली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.