Shiv Jayanti 2024 : गडकोट, किल्ले हा आपला ठेवा; तो जपण्याचे काम करू- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, त्यांनी वास्तुकला, अभियांत्रिकी, किल्ल्यावरील प्रत्येक थेंब पाण्याचा उपयोग करून घेण्याची दूरदृष्टी त्या काळी दाखवली. पर्यटन विभागाने हिंदवी स्वराज्य महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल विभागाचे त्यांनी अभिनंदन केले.

138
Shiv Jayanti 2024 : गडकोट, किल्ले हा आपला ठेवा; तो जपण्याचे काम करू- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) गडकोट किल्ले हे आपला ठेवा असून तो जपण्याचा प्रयत्न नक्की करू. पहिल्या टप्प्यात शिवाजी महाराजांशी संबंधित विविध २० पर्यटन स्थळे विकसित होत आहेत, त्यात किल्ले रायगडाप्रमाणेच शिवनेरीचाही विकास करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले. किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव (Shiv Jayanti 2024) सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. (Shiv Jayanti 2024)

कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar), सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, माजी खासदार तथा म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) दूरदृष्टीची कल्पना सामान्य माणूस करू शकत नाही, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, त्यांनी वास्तुकला, अभियांत्रिकी, किल्ल्यावरील प्रत्येक थेंब पाण्याचा उपयोग करून घेण्याची दूरदृष्टी त्या काळी दाखवली. पर्यटन विभागाने हिंदवी स्वराज्य महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल विभागाचे त्यांनी अभिनंदन केले. (Shiv Jayanti 2024)

(हेही वाचा – Asian Badminton Championship : भारतीय महिलांना ऐतिहासिक सुवर्ण)

समाज, राज्य, देश आणि माणूस म्हणून आपण अधिक प्रगती करू – मुख्यमंत्री

अखंड हिंदुस्थानचे अभिमान, दैवत आणि लोकशाहीचा कारभार साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीत झाला. शिवछत्रपती (Chhatrapati Shivaji Maharaj) म्हणजे पराक्रम, शौर्य, त्याग, समर्पण आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते. ते सर्वव्यापी होते आणि त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम केले. ते युगपुरुष, युगप्रवर्तक आणि रयतेचे राजे होते. अठरापगड जातीचे, धर्माचे लोक त्यांनी एकत्र आणले. प्रजेच्या दुःखापुढे, कल्याणापुढे स्वतःचे दुःख, आराम कवडीमोल मानला. त्यांनी तलवार हाती घेतली पण निष्पापांच्या रक्ताने रंगू दिली नाही. त्यामुळे त्यांच्या तलवारीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो. ते केवळ व्यक्ती नाही तर विचार होते. शिवरायांकडील (Chhatrapati Shivaji Maharaj) एक तरी गुण आपण सर्वांनी घेतल्यास शिवजयंती (Shiv Jayanti 2024) साजरी करताना त्यांना हेच खरे अभिवादन ठरेल. त्यामुळे समाज, राज्य, देश आणि माणूस म्हणून आपण अधिक प्रगती करू, असेही मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले. (Shiv Jayanti 2024)

मध्यंतरी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील नौदलाच्या कार्यक्रमात त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले तसेच नौदलाच्या ध्वजावर शिवप्रतीमेला समाविष्ट केले ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. कुपवाडा येथे भारत पाकिस्तान सीमेवर लष्करी जवानांनी शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. आग्र्याला देखील दिवाण-ए-आम येथे शिवाजी महाराजांची जयंती (Shiv Jayanti 2024) गतवर्षीपासून साजरा करतो, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj)  गडकोट किल्ले जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रधानमंत्री यांनी शिफारस केली आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. जुन्नर हा पर्यटन तालुका असून बिबट सफारी विकसित करण्याचे घोषित केले आहे. येथील सुकाळवेढे, बोरघर, डूचकेवाडी, खेतेपठार मार्गे शिवजन्म भूमी आणि भीमाशंकर ही तीर्थक्षेत्रे जोडण्याचा प्रयत्न करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले. (Shiv Jayanti 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.