Ind vs Eng 2nd Test : इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून रवींद्र जडेजा आणि के एल राहुलची माघार

184
Ind vs Eng 2nd Test : इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून रवींद्र जडेजा आणि के एल राहुलची माघार
Ind vs Eng 2nd Test : इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून रवींद्र जडेजा आणि के एल राहुलची माघार

ऋजुता लुकतुके

इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय क्रिकेट संघाला सोमवारी दोन मोठे धक्के बसले.(Ind vs Eng 2nd Test) आधीच मालिकेत ०-१ अशी पिछाडी आणि त्यातच संघातील मधल्या फळीतील महत्त्वाचा फलंदाज के एल राहुल आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे या कसोटीतून बाहेर पडले आहेत. (Ind vs Eng 2nd Test) जडेजाला पहिल्या कसोटीतच फलंदाजी करताना दुखापत झाली होती. तो धावचीत झाला तेव्हा अडखळत धावत होता. त्याच्या मांडीचा स्नायू दुखावला आहे. तर के एल राहुलनेही पहिल्या डावात ८६ धावांची खेळी केली होती. तो ही कंबर दुखीमुळे त्रस्त आहे.

(हेही वाचा – Budget Session 2024 : अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशींनी बोलवली सर्वपक्षीय बैठक)

दुसरी कसोटी २ फेब्रुवारीला विशाखापट्टणम इथं होणार आहे. ‘जडेजाला हैद्राबाद कसोटीत चौथ्या दिवशी खेळतानाच दुखापत झाली. तर राहुलने सामन्यानंतर डाव्या बाजूला कंबर दुखत असल्याची तक्रार केली होती. स्कॅन केल्यावर त्याला विश्रांतीची गरज असल्याचं समोर आलं. बीसीसीआयची वैद्यकीय टीम दोघांवर लक्ष ठेवून आहे,’ असं बीसीसीआयच्या पत्रकात म्हटलं आहे.(Ind vs Eng 2nd Test)

या दोघांऐवजी आता भारतीय संघात सर्फराज खान आणि सौरभ कुमार यांची निवड करण्यात आली आहे. तर वॉशिंग्टन सुंदरही संघात आला आहे. सर्फराज खानचा पहिल्यांदाच भारतीय संघात समावेश झालाय. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्फराज सातत्याने आणि खोऱ्याने धावा काढणारा फलंदाज म्हणून प्रसिद्ध आहे. तर अलीकडेच इंग्लंड लायन्स संघाकडूनही त्याने भारतीय ए संघाकडून धावांचा रतीब धातला होता.

(हेही वाचा –Amrita Shergill : एम. एफ. हुसैन देखील पाणी भरेल जिच्या घरी अशी हंगेरियन-भारतीय सुप्रसिद्ध चित्रकार अमृता शेरगिल)

तर वॉशिंग्टन सुंदर अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात आला आहे हे उघड आहे. (Ind vs Eng 2nd Test) रवींद्र जडेजाच्या जागी त्याची भारतीय संघात वर्णी लागू शकते. तर के एल राहुलची जागा आधीपासून संघात असलेला रजत पाटिदार घेऊ शकतो. पण, राहुल आणि जडेजाची उणीव भारतीय संघाला जाणवणार एवढं नक्की. कारण, दोघंही संघासाठी सातत्याने उपयुक्त कामगिरी करत आहेत.

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात राहुलने भारतीय संघात दुखापतीनंतर पुनरागमन केलं. आणि तेव्हापासून एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्येही तो सातत्यपूर्ण कामगिरी करतोय. दक्षिण आफ्रिकेत त्याने कठीण परिस्थितीत शतक झळकावलं. तर हैद्राबादमध्येही त्याने ८६ धावा केल्या होत्या. तर भारतीय खेळपट्टीवर फिरकी गोलंदाज आणि डावखुरा फलंदाज म्हणून रवींद्र जडेजाची जागा भक्कम आहे. आधीच्या कसोटीत भारतासाठी त्याने सगळ्यात जास्त धावा केल्या होत्या. दोघांच्या अनुपस्थितीत भारतीय संघ नक्कीच दुबळा झाला आहे.

विशाखापट्टणम कसोटीसाठी भारतीय संघ, रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, रजत पाटिदार, सर्फराज खान, सौरभ कुमार, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार व आवेश खान

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.