Budget Session 2024 : अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशींनी बोलवली सर्वपक्षीय बैठक

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी हा १० दिवसांचा असतो. अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन ९ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

179
Budget Session 2024 : अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशींनी बोलवली सर्वपक्षीय बैठक

अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी (Budget Session 2024) संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी दोन्ही सभागृहातील सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक घेणार आहेत. आज म्हणजेच मंगळवार ३० जानेवारी दुपारी संसदेच्या ग्रंथालयात ही बैठक होणार आहे. अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणाने होईल. ९ फेब्रुवारी रोजी या अधिवेशनाचा समारोप होईल.

(हेही वाचा – Guru Satyanarayan Goenka : जाणून घ्या भारतीय विपश्यना गुरु सत्यनारायण गोयंका यांचा यशस्वी उद्योजक ते गुरु असा प्रवास)

प्रल्हाद जोशी यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांना या बैठकीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. यावर्षी एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या निवडणुकांपूर्वी चालू लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे संसदेचे (Budget Session 2024) शेवटचे अधिवेशन असेल. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री १ फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील.

या बैठकीत सरकार विरोधी पक्षांसोबत अधिवेशनाचा अजेंडा सामायिक करते. याशिवाय सभागृहाचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी विरोधकांच्या सहकार्याची विनंती करण्यात येणार आहे. (Budget Session 2024)

(हेही वाचा – BMS Employee Seema Mane : आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखरावर पोहोचले मुंबई महापालिकेचे नाव)

भारतीय उद्योग महासंघाने केली ही मागणी –

अर्थसंकल्पावरील (Budget Session 2024) आपल्या अपेक्षा आणि शिफारशी देताना भारतीय उद्योग महासंघाने (सीआयआय) म्हटले आहे की, सरकारने निर्गुंतवणुकीसाठी आणि निर्गुंतवणुकीची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी ३ वर्षांचा कार्यक्रम ठरवावा. याव्यतिरिक्त, पेट्रोलियम, वीज आणि स्थावर मालमत्ता यांचा देखील जीएसटीमध्ये समावेश केला जावा आणि तीन दर संरचनेचे लक्ष्य पूर्ण केले जावे. भांडवली खर्च २० टक्क्यांनी वाढवून १२ लाख कोटी रुपये करावा आणि स्वतंत्र गुंतवणूक मंत्रालय स्थापन करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. (Budget Session 2024)

(हेही वाचा – Amrita Shergill : एम. एफ. हुसैन देखील पाणी भरेल जिच्या घरी अशी हंगेरियन-भारतीय सुप्रसिद्ध चित्रकार अमृता शेरगिल)

अर्थसंकल्पीय अधिवेशन १० दिवस चालते.

अर्थसंकल्पीय (Budget Session 2024) अधिवेशनाचा कालावधी हा १० दिवसांचा असतो. अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन ९ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करतील. अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणाने होईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.