Guru Satyanarayan Goenka : जाणून घ्या भारतीय विपश्यना गुरु सत्यनारायण गोयंका यांचा यशस्वी उद्योजक ते गुरु असा प्रवास

विपश्यना ही एक प्रकारची अध्यात्मिक साधना आहे. भगवान बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी ही साधना शोधून काढली होती. मनाला आलेली मरगळ, दुःख दूर करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.

290
Guru Satyanarayan Goenka : जाणून घ्या भारतीय विपश्यना गुरु सत्यनारायण गोयंका यांचा यशस्वी उद्योजक ते गुरु असा प्रवास

सत्यनारायण गोयंका म्हणजेच एस. एन. गोयंका (Guru Satyanarayan Goenka) हे विपश्यना ध्यान पद्धतीचे प्रसिद्ध बर्मी-भारतीय गुरु होते. त्यांचा जन्म ३० जानेवारी १९२४ ब्रह्मदेशात म्हणजेच बर्मामध्ये झाला. विशेष म्हणजे पूर्वी ते एक यशस्वी उद्योजक होते. १९५५ मध्ये त्यांना मायग्रेनचा गंभीर त्रास होऊ लागला. त्यांनी पुष्कळ औषधोपचार केले. मग मित्राने सुचवल्यानुसार ते विपश्यना शिक्षक सयागयी उ बा खिन यांना भेटले.

(हेही वाचा – Kalyan – Dombivli Water Cut : कल्याण – डोंबिवलीमध्ये दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार)

सयागयी उ बा खिन यांनी सुरुवातीला नकार मात्र नंतर त्यांनी त्यांचा (Guru Satyanarayan Goenka) शिष्य म्हणून स्वीकार केला. गोयंका यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली १४ वर्षे या ध्यानाचे प्रशिक्षण घेतले. १९६९ मध्ये गोयंका भारतात आले आणि त्यांनी विपश्यनाचे शिक्षण देण्यास सुरुवात केली आणि त्यांनी १९७६ मध्ये नाशिकजवळ इगतपुरी येथे एक ध्यान केंद्र स्थापन केले. भारतात ही उपासना पद्धती लोकोपयोगी करण्याचा आग्रह त्यांच्या गुरुंनीच त्यांना केला होता. (Guru Satyanarayan Goenka)

(हेही वाचा – Hemant Soren : ईडीची धास्ती : ईडीच्या कारवाईनंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन बेपत्ता)

विपश्यना ही एक प्रकारची अध्यात्मिक साधना आहे. भगवान बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी ही साधना शोधून काढली होती. मनाला आलेली मरगळ, दुःख दूर करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. आज गोयंका (Guru Satyanarayan Goenka) यांच्या कृपेमुळे संपूर्ण भारतात ही विद्या शिकवली जाते. जगभरातही या साधना पद्धतीचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे आणि पुष्कळ लोकांना याचा लाभही झाला आहे. २०१२ मध्ये ६३ व्या प्रजासत्ताक दिनी त्यांना त्यांच्या योगदानासाठी पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.