Hemant Soren : ईडीची धास्ती : ईडीच्या कारवाईनंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन बेपत्ता

अंमलबजावणी संचालनालयाने सोमवारी सकाळी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या घरी छापा टाकला आणि त्यांची चौकशी नाट्यमय पद्धतीने सुरू केली, त्यानंतर अद्याप मुख्यमंत्र्यांचा शोध लागलेला नाही.

180
Hemant Soren : ईडीची धास्ती : ईडीच्या कारवाईनंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन बेपत्ता

जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी (२९ जानेवारी) कारवाई सुरू केल्यापासून झारखंडचे (Hemant Soren) मुख्यमंत्री हेमंत सोरेन बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या ईडीच्या काही सूत्रांनी दावा केला की सोरेन बेपत्ता आहेत आणि त्यांचे सर्व फोन देखील बंद आहेत. तपास संस्थेला अद्याप त्याच्याशी संपर्क साधता आलेला नाही.

(हेही वाचा – Kunbi Certificate वरून भाजप नेत्यांमध्ये गटबाजी)

अंमलबजावणी संचालनालयाने सोमवारी सकाळी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांच्या घरी छापा टाकला आणि त्यांची चौकशी नाट्यमय पद्धतीने सुरू केली, त्यानंतर अद्याप मुख्यमंत्र्यांचा शोध लागलेला नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत सोरेन आपल्या एका सुरक्षारक्षकासह पहाटे २:३० वाजता दिल्लीतील आपल्या निवासस्थानावरून बाहेर पडले. मुख्यमंत्री आणि त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन मात्र बंद येत आहेत. दरम्यान ईडीने सोमवारी रात्री दिल्लीतील घरातून हेमंत सोरेनची बीएमडब्ल्यू जप्त केली.

(हेही वाचा – ICC Lifts Ban on Sri Lanka : आयसीसीने श्रीलंकन क्रिकेट मंडळावरील बंदी हटवली)

भाजपाची टीका – 

सोरेन (Hemant Soren) २७ जानेवारीला रांचीहून दिल्लीला रवाना झाले होते. त्यांच्या पक्षाने सोमवारी सांगितले की ते वैयक्तिक कामासाठी निघाले आहेत आणि लवकरच रांचीला परततील. मात्र, अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कारवाईच्या भीतीने राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन गेल्या १८ तासांपासून फरार असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) झारखंड शाखेने सोमवारी केला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना या प्रकरणाची दखल घेण्याचे आवाहन करत भाजपने झारखंडची विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा धोक्यात असल्याचे म्हटले आहे.

(हेही वाचा – Kalyan – Dombivli Water Cut : कल्याण – डोंबिवलीमध्ये दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार)

अधिकृत सूत्रांनी सांगितले की, कथित जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात ईडीने २० जानेवारी रोजी सोरेन (Hemant Soren) यांची रांची येथील अधिकृत निवासस्थानी चौकशी केली होती आणि त्यांना नव्याने समन्स बजावून २९ जानेवारी किंवा ३१ जानेवारी रोजी हजर राहण्यास सांगितले होते. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, सोरेन यांनी एजन्सीला पत्र पाठवले होते, परंतु चौकशीचा दिवस किंवा तारीख सांगितली नव्हती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.