Amrita Shergill : एम. एफ. हुसैन देखील पाणी भरेल जिच्या घरी अशी हंगेरियन-भारतीय सुप्रसिद्ध चित्रकार अमृता शेरगिल

156
Amrita Shergill : एम. एफ. हुसैन देखील पाणी भरेल जिच्या घरी अशी हंगेरियन-भारतीय सुप्रसिद्ध चित्रकार अमृता शेरगिल
Amrita Shergill : एम. एफ. हुसैन देखील पाणी भरेल जिच्या घरी अशी हंगेरियन-भारतीय सुप्रसिद्ध चित्रकार अमृता शेरगिल

अमृता शेरगिल (Amrita Shergill) या भारतातील प्रसिद्ध चित्रकार होती. त्यांचा जन्म बुडापेस्ट, हंगेरी येथे झाला. त्यांचे वडील शीख होते, त्यांचं नाव उमरावसिंह शेरगिल – ते संस्कृत-पर्शियन भाषेचे विद्वान होते आणि आई मेरी अँटोनी गॉट्समन ही हंगेरियन वंशाची ज्यू ऑपेरा गायिका होती. तर अमृताने वयाच्या ८ व्या वर्षी कॅनव्हॉअसवर हाय फिरवायला सुरुवात केली तर त्याचबरोबर पियानो-व्हायोलिनवर तिची बोटे लिलया नाचत होती.

१९२१ मध्ये अमृताचे (Amrita Shergill) कुटुंब शिमल्यात स्थायिक झाले. पुढे तिच्या आईने तिला इटलीला नेले. तिथेच तिच्यातली चित्रकार घडत गेली. १९३४ ला ती पुन्हा भारतात आली. ती नुकतीच वयात आली होती आणि इतक्या कमी वयात ती प्रसिद्ध चित्रकार बनली. त्यावेळी ती २२ वर्षांची देखील नव्हती. खरं सांगायचं तर आपल्याकडे अनेक मोठमोठे चित्रकार झाले आहेत आणि एम.एफ. हुसैन सारखे देशद्रोही चित्रकार देखील झाले. पण आपण अमृता शेरगिलची साधी चर्चा देखील करत नाही, हे दुर्दैव आहे.

(हेही वाचा –Pune MBA College : पुण्यामध्ये योग्य एमबीए कॉलेज कसं निवडाल?

तिचे शिक्षण पॅरिसमध्ये झाले असले तरी तिच्या चित्रांना आकार भारतातच प्राप्त झाला. तिच्या चित्रांमध्ये भारतीय चैतन्य आहे. १९७६ आणि १९७९ मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने भारतातील नऊ सर्वोत्तम कलाकारांमध्ये अमृताचा (Amrita Shergill) समावेश केला आहे. अमृताने १०३८ मध्ये तिच्या हंगेरियन चुलत बहिणीशी लग्न केले. त्यानंतर ती गोरखपूर येथे स्थायिक झाली.

१९४१ मध्ये अमृता (Amrita Shergill) तिच्या पतीसोबत लाहोरला गेली. जिथे तिच्या चित्राचे पहिले मोठे वैयक्तिक प्रदर्शन होणार होते. पण अचानक ती गंभीर आजारी पडली आणि कॉमामध्ये गेली. आणि आश्चर्य म्हणजे ५ डिसेंबर १९४१ रोजी वयाच्या २८ व्या वर्षी तिचे निधन झाले. तिच्या आईने तिच्या पतीवर खूनाचे गंभीर आरोप केले. मात्र तिच्या मृत्यूचे रहस्य आजपर्यंत उलगडले नाही. मात्र भारताने एका महान चित्रकाराला गमावले होते.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.