Ind vs Eng 1st Test : इंग्लंडची बॅझबॉल रणनीती काय आहे? भारता विरुद्ध ती यशस्वी होईल का?

इंग्लिश संघान आपल्या आक्रमक बॅझ-बॉल रणनीतीने कसोटी क्रिकेटचा चेहरामोहराच बदलला आहे.

177
Ind vs Eng 1st Test : इंग्लंडची बॅझबॉल रणनीती काय आहे? भारता विरुद्ध ती यशस्वी होईल का?
Ind vs Eng 1st Test : इंग्लंडची बॅझबॉल रणनीती काय आहे? भारता विरुद्ध ती यशस्वी होईल का?
  • ऋजुता लुकतुके

भारत विरुद्ध इंग्लंड पाच कसोटींची मालिका (Ind vs Eng 1st Test) येत्या २५ जानेवारीपासून हैद्राबाद इथं सुरू होत आहे. आणि या पहिल्या कसोटीपूर्वी क्रिकेट वर्तुळात पुन्हा एकदा इंग्लिश संघाच्या बॅझबॉल रणनीतीविषयी चर्चा सुरू झाली आहे. जो रुटच्या नेतृत्वाखालील इंग्लिश संघ बॅझ-बॉल रणनीतीच वापरणार हे त्यांनी स्पष्ट केलंय. पण, भारतीय वातावरणात आणि इथल्या खेळपट्टीवर, जिथे चेंडू धिमा बॅटवर येतो, तिथे ही रणनीती यशस्वी होईल का, हाच प्रश्न आहे.

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल आथर्टनने बॅझबॉल वि, विराटबॉल अशी ही लढत असेल असं म्हटलं आहे. तर भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजनसिंगने भारतात बॅझबॉल यशस्वी होण्याची शक्यता कमीच असल्याचं म्हटलंय.

‘या कसोटी मालिकेत इंग्लंडसाठी पोषक खेळपट्ट्या नसतील. अगदी पहिल्या चेंडूपासून खेळपट्टी वळेल. आणि दोन्ही बाजूंनी फिरकी गोलंदाजच चेंडू टाकत असेल. अशावेळी बॅझबॉल रणनीती कठीणच असेल. इंग्लिश फलंदाजांचाच खरा कल लागेल,’ असं सांगतानाच हरभजन सिंगने ही मालिका भारताच्या बाजूने निकाली लागेल अशी शक्यताही वर्तवली.

(हेही वाचा – Ayodhya Rammandir : आमच्या तपस्येत कमी राहिली होती; पंतप्रधानांनी केली प्रभु श्रीरामाच्या चरणी क्षमायाचना)

बॅझबॉल रणनीतीची इतकी चर्चा होत असताना ही रणनीती नेमकी आहे काय ते ही समजून घेऊया,

बॅझबॉल रणनीती म्हणजे नेमकं काय?

न्यूझीलंडचा शैलीदार आणि यशस्वी फलंदाज ब्रेंडन मॅक्युलमच्या नावाने ही रणनीती ओळखली जाते. कारण, ब्रँडनला ड्रेसिंग रुममध्ये बॅझ हे नाव पडलं होतं. तो अगदी बेडर पद्धतीने फलंदाजी करायचा. आणि समोर परिस्थिती काहीही असली तरी आपली शैली बदलायचा नाही. संघाचा १ फलंदाज बाद झालेला असो वा ९, तो आपल्या पद्धतीने खेळण्यासाठी मशहूर होता. आता तो इंग्लिश संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. आणि त्यानेच संघात ही रणनीती रुजवलीय.

किवी संघाचा कर्णधार म्हणूनही तो असेच धाडसी निर्णय घ्यायचा. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल आथर्टननेच इंग्लिश संघाची बदलेली निर्णय पद्धती आणि बेन स्टोक्स शैलीतील क्रिकेट पाहून बॅझबॉल रणनीतीची पहिल्यांदा आठवण काढली. आणि तिथून हे नाव रुढ झालं.

(हेही वाचा – Muslim : पनवेल रेल्वेस्थानक परिसरात भगवे ध्वज लावण्यास धर्मांधांचा विरोध )

पाक दौऱ्यात एकदा इंग्लिश संघाने पहिल्याच दिवशी ५०६ धावांचा डोंगर उभा केला. आक्रमक फलंदाजीचा नमुनाच इंग्लिश संघाने दाखवला. आणि कसोटीत जे वर्चस्व मिळवलं, ते शेवटच्या क्षणापर्यंत टिकवून ठेवलं. त्या आक्रमणापुढे पाक संघ ढेपाळला. एका दिवसांत सर्वाधिक धावांचा विक्रम तेव्हापासून इंग्लिश संघाच्या नावावर आहे.

त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध ॲशेस मालिकेतही इंग्लंडने आपली हीच रणनीती कायम ठेवली. जो रुट, बेन स्टोक्स आणि जोस बटलर हे बेदरकार फटके खेळणारे फलंदाज आणि जेम्स अँडरसन, मार्क वूड हे गोलंदाज चेंडू टाकताना आक्रमक क्षेत्ररचना अशी ही इंग्लिश संघाची रणनीती आहे. आतापर्यंत कसोटीत या रणनीतीमुळे इंग्लिश संघाने जगभरात आपली हवा निर्माण केली आहे. एकदा कसोटी विजेतेपदही मिळवलं आहे.

पण, आता त्यांची खरी कसोटी आहे ती भारतीय संघाविरुद्ध भारतीय वातावरणात खेळताना.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.