Ind vs Eng 1st Test : जो रुटने मोडला सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम

भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या कसोटींत जो रुट सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.

266
Ind vs Eng 1st Test : जो रुटने मोडला सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम
Ind vs Eng 1st Test : जो रुटने मोडला सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम
  • ऋजुता लुकतुके

भारत विरुद्ध इंग्लंड (Ind vs Eng 1st Test) दरम्यानच्या हैद्राबाद कसोटीत जो रुटने एका विक्रमाला गवसणी घातली आहे. कसोटीच्या पहिल्या दिवसाला सुरुवात झाली तेव्हा इंग्लंडने नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेतली. आणि त्यांचा महत्त्वाचा फलंदाज जो रुटला (Joe Root) तेव्हा सचिनच्या एका विक्रमाची बरोबरी करण्यासाठी फक्त १० धावा हव्या होत्या. प्रत्यक्षात जो रुटने २९ धावा केल्या आणि त्याच्या एकूण धावा झाल्या २,५५५.

जो रुटने (Joe Root) इतक्या धावा भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत केल्या आहेत. आणि असं करताना सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) २,५३५ धावांचा आधीचा विक्रम मागे टाकला आहे. सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) या धावा ३२ कसोटींत केल्या होत्या. तर सचिनला मागे टाकण्यासाठी जो रुटने ४८ कसोटी घेतल्या. (Ind vs Eng 1st Test)

(हेही वाचा – Naxal commander Santosh Shelar : संतोष शेलार एटीएसच्या ताब्यात : कबीर कला मंचचे नक्षली नेटवर्क पुन्हा उघड)

जो रुटसाठी (Joe Root) कसोटीचा पहिला दिवस आणखी एका विक्रमाचा होता. आयसीसीची कसोटी अजिंक्यपद स्पर्धा सुरू झाल्यापासून त्यात ४,००० धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. आतापर्यंत ४८ कसोटींत त्याने ४,०१६ धावा केल्या आहेत. हैद्राबाद कसोटीत रुटने ६० चेंडूंत २९ धावा केल्या. त्याचा जम बसतोय असं वाटतानाच रवी जाडेजाच्या एका चेंडूवर तो फसला आणि फाईन लेगला जसप्रीत बुमराकडे झेल देऊन बाद झाला. इंग्लिश संघाचा पहिला डाव २४६ धावांत गुंडाळला आहे. (Ind vs Eng 1st Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.