ICC Cricket World Cup : ऑस्ट्रेलियासोबतच्या पहिल्या सामन्यात जिंकू शकेल का भारतीय क्रिकेट टीम?

104

आयसीसी विश्वचषक २०२३ (ICC Cricket World Cup) मध्ये भारताला ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. मात्र त्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार फलंदाज शुभमन गिल डेंग्यू पॉझिटिव्ह आढळला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शुभमन गिलला खेळवणे कठीण आहे. तो चेन्नईत असून त्याच्यावर उपचार केले जाणार आहेत. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात खेळण्याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. शुक्रवारी चाचणी केल्यानंतर याबाबत अपडेट मिळू शकेल.

वनडे विश्वचषकाला (ICC Cricket World Cup) गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने गतविजेत्या इंग्लंडचा ९ गडी राखून पराभव करत स्पर्धेची विजयी सुरुवात केली. आता भारतीय चाहत्यांची नजर रविवारी होणाऱ्या भारताच्या पहिल्या सामान्याकडे लागली आहे. परंतु त्यापूर्वी भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा एक स्टार फलंदाज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यातून बाहेर होऊ शकतो.

 (ICC Cricket World Cup) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सध्याच्या भारताचा सर्वात यशस्वी फलंदाज सुभमन गिल याला डेंग्यूची लागण झाल्याने खूप ताप आल्याची माहिती आहे. शुक्रवारी त्याची डेंग्यूची चाचणी करण्यात येणार असून त्यानंतर त्याच्या खेळण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, “चेन्नईला आल्यापासून शुभमनला खूप ताप आहे. त्याची चाचणी करण्यात आली आहे. शुक्रवारी आणखी चाचण्या होतील आणि त्यानंतर पहिल्या सामन्यात त्याच्या खेळण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

(हेही वाचा Railway Accident : रेल्वेचा अपघात घडवण्याचा आणखी एक कट उधळला)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.