BCCI: महेंद्रसिंग धोनीच्या ७ नंबरच्या जर्सीबाबत बीसीसीआयकडून महत्त्वाचा निर्णय

महेंद्रसिंग धोनीची ७ नंबरची जर्सी कोणत्याही भारतीय खेळाडूसाठी उपलब्ध होणार नाही.

158
BCCI: महेंद्रसिंग धोनीच्या ७ नंबरच्या जर्सीबाबत बीसीसीआयकडून महत्त्वाचा निर्णय
BCCI: महेंद्रसिंग धोनीच्या ७ नंबरच्या जर्सीबाबत बीसीसीआयकडून महत्त्वाचा निर्णय

भारताचा वर्ल्ड कप (Indian Cricket Team) विजेता कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या ७ नंबरच्या जर्सीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता ही जर्सी कोणत्याही खेळाडूला उपलब्ध होणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) (Board of Control for Cricket in India) यापूर्वी सचिन तेंडुलकरची १० क्रमांकाची जर्सीही निवृत्त झाली होती, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

धोनीच्या आंतरराष्ट्रीय निवृत्तीनंतर साधारण ३ वर्षांनंतर बीसीसीयने हा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे धोनीची ७ नंबरची जर्सी आता कोणत्याही भारतीय खेळाडूसाठी उपलब्ध होणार नाही.

(हेही वाचा – ATS Raid : पुण्यात आठ बांगलादेशी ताब्यात; एटीएसची कारवाई )

भारतीय क्रिकेट क्षेत्रातील कर्णधार महेंद्रसिंग धोनीने दिलेल्या योगदानाला सन्मान प्राप्त व्हावा, याकरिता बीसीसीआयकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. याविषयी इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, खेळातील योगदानाबद्दल धोनीचा टी-शर्ट (७ क्रमांकाची जर्सी) निवृत्त करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. एमएस धोनीची (MS Dhoni) 7 नंबरची जर्सी इतर कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूने परिधान केली नाही आणि 10 नंबरची जर्सी आधीच उपलब्ध संख्येच्या यादीतून बाहेर पडली होती.

बीसीसीआयने भारतीय संघातील खेळाडूंना सांगितले आहे की, ते भारतीय जर्सी परिधान करताना त्या जर्सीच्या पाठीवर 7 क्रमांकाचा वापर करू शकत नाहीत. खेळाडूंना १० क्रमांकाची जर्सी वापरण्याचीही परवानगी नाही. महेंद्रसिंग धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय स्वरुपातून (international format)  निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याने यापूर्वी २०१४ मध्ये घेतलेल्या कसोटी (test format) स्वरुपातून निवृत्ती घेतली होती.

हेही वाचा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.