BMW M3 : बीएमडब्ल्यू एम सीरिजची ‘ही’ कार आहे सगळ्यात जलद आणि स्पोर्टी 

बीएमडब्ल्यू एम सीरिजची नवीन कार पुढील वर्षी भारतात लाँच होत आहे. जाणून घेऊया गाडीचे फिचर आणि किंमत 

186
BMW M3 : बीएमडब्ल्यू एम सीरिजची ‘ही’ कार आहे सगळ्यात जलद आणि स्पोर्टी 
BMW M3 : बीएमडब्ल्यू एम सीरिजची ‘ही’ कार आहे सगळ्यात जलद आणि स्पोर्टी 

ऋजुता लुकतुके

बीएमडब्ल्यूची नवीन (BMW M3) लक्झरी सेदान गाडी पुढील वर्षी भारतात लाँच होण्याच्या तयारीत आहे. गाडीची शक्ती आणि ती चालवताना चालकाला वाटणारी सहजता यामुळे आधीपासूनच या गाडीची चर्चा आहे. गाडीचं इंजिन ३ लीटर स्ट्रेट ६ क्षमतेचं आहे. या इंडिनला ६ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सची साथ असेल.

ही गाडी शून्य ते ताशी १०० किमीचा वेग निव्वळ ४-५ सेकंदात गाठू शकते. या गाडीचा टॉप वेग असेल १५० ते १८० किमी प्रतीतास. या गाडीचं डिझाईन हे कंपनीच्या आधुनिक डिझाईन श्रेणीतील आहे. आणि त्यातही एम सीरिजमधील ही कार स्पोर्टी लूकमधील आहे.

बीएमडब्ल्यू एम३ (BMW M3) गाडीचं वैशिष्ट्य असणार आहे ते तिच्या सुरक्षिततेसाठी घेतलेल्या खबरदारीमुळे. चालकाच्या सुरक्षिततेसाठी गाडीची टक्कर टाळणारी अद्ययावत यंत्रणा, ब्लाईन्ड स्पॉट ओळखणारी यंत्रणा, लेन सोडून गाडी भरकटत असेल तर त्याचा इशारा देणारी यंत्रणा अशा सुविधा या गाडीत आहेत. शिवाय गाडीतील चारही प्रवाशांसाठी एअरबॅग आहेत.

भारतात ही गाडी पुढील वर्षाच्या मध्यावर लाँच होईल अशी अपेक्षा आहे. आणि तिची स्पर्धा असेल ऑडी ए८, पोर्श ७१८ आणि मसेराटी लेवांते या गाड्यांशी असेल. आणि या गाडीची किंमत असेल १.३ कोटी ते १.६ कोटी रुपयांच्या दरम्यान.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.