Smart meter पासून सर्वसामान्यांची सुटका; सरकारकडून जनआक्रोशाची दखल

338
Smart meter पासून सर्वसामान्यांची सुटका; सरकारकडून जनआक्रोशाची दखल

आता तुम्हाला मोबाईल फोनप्रमाणे वीजेच्या मीटरचं रिचार्ज करावं लागणार आहे. त्यासाठी स्मार्ट मीटर Smart Meter लावण्यास सुरूवात झाली. मात्र ऊर्जामंत्री असणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadanvis) यांच्या नागपुरातून आणि विदर्भातून स्मार्ट मीटर विरोधात जोरदार विरोध सुरू आहे. या आंदोलनावेळी पुतळे जाळण्यात आलेत. दरम्यान मागील काही दिवसांपासून विजेच्या स्मार्ट मिटरविरोधात सुरू असलेल्या जनआक्रोश दखल राज्य सरकारने घेतली आहे. घरगुती वापरासाठी स्मार्ट मीटर लागू केले जाणार नाहीत, त्यासाठी पूर्वीचीच पद्धत कायम राहील, असे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी जाहीर केले. (Smart meter)

शुक्रवारी मुंबईत भाजपाच्या महत्तवाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात फडणवीस यांनी सामान्य वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाही, असे स्पष्ट केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (State President Chandrasekhar Bawankule) यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली. त्यामुळे आता घरगुती आणि लहान व्यावसायिकांसाठी स्मार्ट मीटर न लावता ते केवळ औद्योगिक आणि मोठ्या वीज ग्राहकांसाठी ते लावले जातील, असे स्पष्ट झाले आहे. (Smart meter)

(हेही वाचा – Using Multiple SIMs : एकापेक्षा जास्त सिमकार्ड वापरली तर अतिरिक्त भूर्दंड पडणार नाही, ट्रायचं स्पष्टीकरण)

वीजेचं स्मार्ट मीटर नेमकं काय? 

वीजेचं स्मार्ट मीटर हे मोबाईलच्या रिचार्जसारखं आहे. प्रिपेड स्मार्ट मीटर लावल्यावर रिचार्ज करावं लागेल त्यानंतर वीज सुरू होईल. रिचार्ज संपलं की घरात वीज बंद होईल. रिचार्ज संपण्याच्या २ दिवसांपूर्वी मोबाईलवर तसा मेसेजही येईल. म्हणजेच रिडींग घेऊन बिलं देण्याची पद्धत बंद होईल. एका महिन्यात बिल भरलं नाहीतर पुढच्या महिन्यात दोन्ही महिन्यांचं बिल भरण्याची पद्धतच बंद होईल. म्हणूनच वीजेच्या स्मार्ट मीटरला विरोध होत असल्याचे दिसतंय. (Smart meter)

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.