ICC Cricket World Cup IND VS Sri Lanka : भारताचे श्रीलंकेसमोर ३५८ धावांचे आव्हान; तिघांचे शतक हुकल्याने थोडीशी निराशा

115

ICC Cricket World Cup अंतर्गत गुरुवार, २ नोव्हेंबर राय मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध श्रीलंका या सामन्यांत अवघ्या क्रकेट विश्वाचे लक्ष्य होते, कारण या सामन्यात विरोट कोहलीचे होणारे शतक मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे रेकॉर्ड मोडत ४९ वे शतक ठोकणार होता, पण दुर्दैवाने विराट कोहली ८८ धावांवर बाद झाला आणि त्यांचे स्वप्न अधुरे राहिले, त्या आधी शुभमन गिल हा शतकाच्या तोंडावर येऊन ९२व्या धावांवर बाद झाला पुढे श्रेयस अय्यर हा देखील ८२ धावा करून बाद झाला आणि त्याचेही शतक हुकले, अशा प्रकारे या सामन्यात भारतीय संघातील तीन खेळाडूंना शतकापासून दूर राहावे लागले, मात्र त्यांच्या खेळीमुळे भारताने श्रीलंकेच्या समोर ३५८ धावांचे लक्ष्य उभे केले आहे.

ICC Cricket World Cup मधील सामन्यात श्रीलंकेला विजयासाठी ३५८ धावांची गरज आहे. भारताने एकूण ८ विकेट्स गमावले. रोहित शर्मा दुसऱ्या चेंडूवर बाद झाल्यानंतर मागील सर्व फलंदाजांनी चांगली खेळी करत ही धावसंख्या उभारली. ICC विश्वचषक २०२३ च्या ३३ व्या सामन्यात टीम इंडियाचा श्रीलंकेशी सामना सुरु आहे. रोहितच्या पलटणने विजयाचा षटकार ठोकला आहे आणि तो या स्पर्धेत आतापर्यंत जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला आहे. दुसरीकडे उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी श्रीलंकेला भारताविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक आहे. विराट कोहली आणि शुभमन गिलने श्रीलंकन गोलंदाजीची पिसे काढली. श्रेयस अय्यरनेही तुफानी खेळी करत ५६ चेंडूत ८२ धावा ठोकल्या. भारताचा पाचवा गडी माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार १२ धावांवर बाद झाला. मात्र रवींद्र जडेजा याने मात्र ३५ धावा करून श्रीलंकेसमोर थोडे अवघड वाटेल असे आव्हान उभे करण्यासाठी हातभार लावला.

(हेही वाचा ICC World Cup 2023 : दक्षिण आफ्रिकेचा विश्वचषकात सर्वाधिक षटकारांचा विक्रम)

सचिनच्या विक्रमापासून विराट दूरच 

विराट कोहलीला पुन्हा एकदा शतकाने हुलकावनी दिली. विराट कोहली वानखेडेवर वनडेतील ४९ वे शतक ठोकेल, अशीच सर्वांना आशा होती. पण लयीत असणाऱ्या विराट कोहलीला मधुशंकाने तंबूत पाठवले. विराट कोहलीने वानखेडेवर रुबाबदार सुरुवात केली होती. त्याने एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर देत धावसंख्या हालती ठेवली होती. शतकाच्या जवळ गेल्यानंतर विराट कोहलीची बॅट थोडी शांत झाली, अन् तिथेच श्रीलंकेच्या मधुशंकाने डाव साधला. मधुशंकाच्या गोलंदाजीवर विराट कोहली बाद झाला. विराट कोहलीने ९४ चेंडूत ८८ धावांची खेळी केली. या खेळीत विराट कोहलीने ११ चौकार लगावले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.