ICC Cricket World Cup IND VS Sri Lanka : भारताकडून लंकादहन; ३०२ धावांनी श्रीलंकेचा दारुण पराभव

60

ICC Cricket World Cup अंतर्गत गुरुवार, २ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध श्रीलंका या सामन्यांकडे अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष्य होते. भारताने श्रीलंकेसाठी ३५८ धावांचे लक्ष्य उभे केले, मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांच्या जोरदार माऱ्यापुढे श्रीलंकेचा सगळा संघ अवघ्या ५५ धावांमध्ये गारद झाला. हा भारताचा विजय ऐतिहासिक आहे. विश्व चषकाच्या सामन्यांमध्ये भारताचा हा सलग ७वा विजय आहे. या विजयाने भारताचे सेमी फायनलसाठीचे स्थान निश्चित झाले आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह याने भारताच्या गोलंदाजीला सुरुवात केली आणि पहिल्याच चेंडूत पहिला बळी घेतला, त्यानंतर मोहम्मद सिराजच्या भेदक माऱ्यात अवघ्या ४ धावांमध्ये श्रीलंकेचे ३ गडी बाद झाले, सिराजनंतर मोहम्मद शमीच्या माऱ्यासमोर श्रीलंकेचा संघ गडगडला. भारतीय गोलंदाजीसमोर श्रीलंकेची अक्षरक्ष: दाणादाण उडाली. भारताकडून मोहम्मद शमीने ५ षटकात १८ धावा देत ५ विकेट घेतल्या. मोहम्मद सिराजने ७ षटाकत १६ धावा देत ३ तर जसप्रीत बुमराहने ५ षटकात ८ धावा देत १ विकेट मिळवली. लंकेची अखेरची विकेट रविद्र जडेजाने घेतली.

(हेही वाचा ICC Cricket World Cup IND VS Sri Lanka : भारताचे श्रीलंकेसमोर ३५८ धावांचे आव्हान; तिघांचे शतक हुकल्याने थोडीशी निराशा)

टॉस जिंकून श्रीलंकेने भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. भारताकडून सलामीवीर शुभमन गिलने ९२, विराट कोहलीने ८८ तर श्रेयस अय्यरने ८२ धावा केल्या. या तिनही फलंदाजांचे शतक हुकले असले तरी टीम इंडियाने ५० षटकात ३५७ धावांची मोठी धावसंख्या उभी केली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.