Highest Score in IPL : आयपीएलमध्ये डावात २०० पेक्षा जास्त धावा किती वेळा झाल्यात? 

Highest Score in IPL : खेळ फक्त २० षटकांचा असला तरी घणाघाती फलंदाजीमुळे २०० पेक्षा मोठी धावसंख्या संघांना कठीण जात नाही. 

151
Highest Score in IPL : आयपीएलमध्ये डावात २०० पेक्षा जास्त धावा किती वेळा झाल्यात? 
  • ऋजुता लुकतुके

इंडियन प्रिमिअर लीग हा खरंतर एका डावात २० षटकांचा फॉरमॅट आहे. पण, खेळाचं वैशिष्ट्यच घणाघाती फलंदाजी हे असल्यामुळे इथं फलंदाज गोलंदाजांवर वर्चस्व गाजवताना दिसतात. आणि त्या प्रयत्नांत अनेकदा धावांचाही डोंगर उभा राहतो. क्रिकेट जगतातील काही रोमहर्षक आणि मोठ्या धावांचा पाठलाग करणारे सामनेही या स्पर्धेत पाहायला मिळाले आहेत. (Highest Score in IPL)

एकतर दहा फ्रँचाईजींचे दहा संघ असलेल्या स्पर्धेत जगातील सर्वोत्तम खेळाडू खेळतात. आणि आक्रमकता हा स्थायीभाव असलेल्या या स्पर्धेत मग एका डावांत अगदी अडीचशे धावाही सहज होतात. त्यातच बंगळुरूचं चिन्नास्वामी स्टेडिअम आणि अगदी मुंबईतील वानखेडे स्टेडिअमही त्याच्या तुलनेनं लहान आकारामुळे फलंदाजीचं नंदनवन म्हणून ओळखली जातात. तिथं षटकार अगदी मनाप्रमाणे खेचता येतात. असे उत्तुंग षटकार खेचून अडीचशे पर्यंत धावसंख्या नेलेल्या डावांचा आढावा इथं घेणार आहोत. (Highest Score in IPL)

(हेही वाचा – Lexus LM 2024 : लेक्ससच्या या नवीन गाडीची भारतातील किंमत माहीत आहे!)

आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या 

आयपीएलला २००८ मध्ये सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत सर्वोच्च धावसंख्या रचण्याचा मान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे जातो. त्यांनी २०१३ च्या हंगामात पुणे वॉरिअर्स विरुद्ध ५ गडी बाद २६३ धावा केल्या होत्या. यात ख्रिस गेलचा एकट्याचा वाटा होता १७५ धावांचा. त्या त्याने ६६ चेंडूंमध्ये केल्या. त्यानंतर बंगळुरू संघाने पुण्याला निर्धारित २० षटकांत ९ बाद १३३ वर रोखलं. आणि हा सामना १३० धावांनी जिंकला. (Highest Score in IPL)

गेल्याच हंगामात बंगळुरू फ्रँचाईजीचा हा विक्रम मोडेल अशी शक्यता निर्माण झाली होती. लखनौ सुपरजायंट्स संघाने पंजाब किंग्ज विरुद्ध पाच बाद २५७ धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे पंजाबकडून या सामन्यात एकाही फलंदाजाने शतक ठोकलं नाही. पण, काईल मायर्स आणि मार्कस स्टॉयनिस यांचं अर्धशतक आणि निकोलस पुरन, आयुष बदोनी यांनी ४० धावा करून संघाला अडीचशे पार नेलं. हा सामना त्यांनी ५६ धावांनी जिंकला. (Highest Score in IPL)

तिसरी सर्वोच्च धावसंख्याही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनेच केली आहे. २०१६ च्या हंगामात त्यांनी गुजरात लायन्स विरुद्ध ३ बाद २४८ धावा केल्या होत्या. २०१३ च्या हंगामापर्यंत आयपीएलमध्ये एकूण १७१ वेळा संघांनी दोनशेचा टप्पा एका डावांत ओलांडला आहे. यात चेन्नई सुपरकिंग्जचा संघ आघाडीवर आहे. (Highest Score in IPL)

(हेही वाचा – Tata Altroz Racer : फोक्सवॅगन पोलोला टक्कर देणारी टाटाची ही रेसर कार पुढील महिन्यात भारतीय रस्त्यांवर)

सर्व संघांनी किती वेळा दोनशेचा टप्पा ओलांडलाय ते पाहूया, 
  • चेन्नई सुपरकिंग्ज – २८
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – २४
  • मुंबई इंडियन्स – २२
  • पंजाब किंग्ज – २१
  • कोलकाता नाईट रायडर्स – १९
  • राजस्थान रॉयल्स – १८
  • सनरायजर्स हैद्राबाद – १६
  • दिल्ली कॅपिटल्स – ११
  • गुजरात टायटन्स – ५
  • लखनौ सुपरजायंट्स – ५
  • डेक्कन चार्जर्स – १
  • गुजरात लायन्स – १

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.