Loksabha Election 2024 : भाजपची ममता बॅनर्जी यांच्या विरोधात मोठी खेळी; संदेशखली बलात्कार पीडितेला दिली उमेदवारी

183
Loksabha Election 2024 : भाजपची ममता बॅनर्जी यांच्या विरोधात मोठी खेळी; संदेशखली बलात्कार पीडितेला दिली उमेदवारी
Loksabha Election 2024 : भाजपची ममता बॅनर्जी यांच्या विरोधात मोठी खेळी; संदेशखली बलात्कार पीडितेला दिली उमेदवारी

भारतीय जनता पक्षाने (BJP) रविवारी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. भाजपने पश्चिम बंगालमधील (West Bengal) 14 लोकसभा जागांसाठी 111 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. संदेशखली बलात्कार पीडित रेखा पात्रा (Rekha Patra) यांना भाजपने बशीरहाट मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय यांनाही तामलुक मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भाजपने संदेशखली पीडित रेखा यांना बशीरहाट (Basirhat) मतदारसंघातून मैदानात उतरवले आहे. (Loksabha Election 2024)

(हेही वाचा – Tata Altroz Racer : फोक्सवॅगन पोलोला टक्कर देणारी टाटाची ही रेसर कार पुढील महिन्यात भारतीय रस्त्यांवर)

दिलीप घोष यांचा मतदारसंघ बदलला

भाजपने आपले माजी अध्यक्ष आणि मेदिनीपूरचे (Medinipur) विद्यमान खासदार दिलीप घोष यांचा मतदारसंघ बदलला आहे. आता ते बर्धमान दुर्गापूरमधून निवडणूक लढवतील आणि आसनसोलचे आमदार अग्निमित्रा पॉल घोष मेदिनीपूरमधून निवडणूक लढवतील. याशिवाय अलीकडेच भाजपात प्रवेश केलेले टीएमसीचे ज्येष्ठ आमदार आणि मंत्री तपस रॉय यांना प्रसिद्ध कोलकाता उत्तर मतदारसंघातून त्यांचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे.

कोलकाता दक्षिण मतदारसंघातून देबाश्री चौधरी

दिलीप घोष यांच्याशिवाय भाजपने माजी केंद्रीय मंत्री देबाश्री चौधरी यांचा मतदारसंघही बदलला आहे. आता त्या प्रतिष्ठित कोलकाता दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवतील. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत रायगंजमधून जिंकल्यानंतर त्या संसदेत गेल्या होत्या, परंतु आता त्यांच्या जागी कार्तिक पाल या जागेवरून निवडणूक लढवतील.

भाजपने पश्चिम बंगालमधील कृष्णानगर लोकसभा मतदारसंघातून कृष्णनगर राजघराण्यातील राजमाता अमृता रॉय यांना उमेदवारी दिली आहे. गेल्या आठवड्यात रॉय यांनी शुभेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला होता. त्या जागी टीएमसीने पुन्हा एकदा महुआ मोईत्रा यांना या जागेवरून उमेदवारी दिली आहे. (Loksabha Election 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.