Happy Birthday Sachin : मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नजाकतभऱ्या फटक्यांचा व्हीडिओ व्हायरल

Happy Birthday Sachin : आयसीसीनेच बनवलेल्या या व्हीडिओत सचिन कारकीर्दीत आव्हान म्हणून उभ्या ठाकलेल्या गोलंदाजांची धुलाई करताना दिसतो 

126
Happy Birthday Sachin : मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नजाकतभऱ्या फटक्यांचा व्हीडिओ व्हायरल
Happy Birthday Sachin : मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नजाकतभऱ्या फटक्यांचा व्हीडिओ व्हायरल
  •  ऋजुता लुकतुके

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Happy Birthday Sachin) बुधवारी वयाची ५१ वर्षं पूर्ण केली. त्याच्या निवृत्तीनंतर १२ वर्षांनंतरही सचिनची नजाकतभरी फलंदाजी लोकांच्या स्मरणातून गेलेली नाही. त्याचा करिश्माही तसाच टिकून आहे. सचिनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सचिनचा एक जुना व्हीडिओ पुन्हा व्हायरल झाला आहे. आयसीसीने (ICC) बनवलेल्या या व्हीडिओत सचिन आधुनिक क्रिकेटमधील भेदक गोलंदाजांना नजाकतीने खेळताना दिसतो. कासिगो रबाडा (Kasigo Rabada), हसन अली (Hasan Ali), जोफ्रा आर्चर (Jofra Archer), पॅट कमिन्स आणि मुस्तफिझुर रेहमान या अलीकडच्या गोलंदाजांची धुलाई करताना सचिन यात दिसतो. (Happy Birthday Sachin)

(हेही वाचा- Mark Zuckerberg: AIवर कोट्यवधी रुपये मेटा खर्च करणार; मार्क झुकेरबर्ग यांची घोषणा)

२२ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत सचिन तेंडुलकर वसिम अक्रम, वकार युनूस यांच्या तेंज गोलंदाजीबरोबरच शेन वॉर्न आणि मुथय्या मुरलीधरन यांच्या फिरकीलाही समर्थपणे खेळला. मॅग्रा, ॲलन डोनाल्ड यांचाही मुकाबला त्याने केला. जगातील कुठल्याही माऱ्याला, कुठल्याही वातावरणात यशस्वीपणे खेळण्याचं सामर्थ्य प्रदीर्घ कारकीर्दीत त्याने सिद्ध केलं. (Happy Birthday Sachin)

पण, आयसीसीने सचिन तेंडुलकरच्या ४८ व्या वाढदिवशी तीन वर्षांपूर्वी त्याच्यावर एक व्हीडिओ तयार केला होता. व्हीडिओबरोबरच्या संदेशात त्यांनी म्हटलं होतं की, ‘सचिन तेंडुलकरचे विविध फटके तुम्ही पाहिले असतील. पण, ते अशाप्रकारे पाहिले नसतील.’ (Happy Birthday Sachin)

तीन वर्षांपूर्वीचा हा व्हीडिओ आता पुन्हा व्हायरल होतोय. यात सचिन त्याची खास छाप असलेला स्ट्रेट ड्राईव्ह, बॅकफूट पंच, कव्हर ड्राईव्ह, पूल आणि लेट कटचा फटका खेळताना दिसतो. सुरुवातीच्या षटकांमध्ये हे हुकमी फटके खेळून सचिनने अनेक धावा जमवल्या आहेत. कठीण परिस्थितीतही हे फटके त्याला हमखास धावा वसूल करून द्यायचे.  (Happy Birthday Sachin)

(हेही वाचा- World Malaria Day : जागतिक मलेरिया दिन; चला करुया मलेरियाचा नायनाट)

क्रिकेटमधील हे पारंपरिक फटके सचिनच्या स्पर्शाने जादूई झाले. या व्हीडिओतून सचिनने सुरू केलेली फलंदाजीची परंपरा तर दिसतेच. शिवाय सचिनचं कालातीत कौशल्यही प्रगट होतं. एका मिनिटाचा हा व्हीडिओ २,७०० लोकांनी शेअर केला आहे. तर त्याला १०,००० च्या वर लाईक्स आहेत. (Happy Birthday Sachin)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.