World Malaria Day : जागतिक मलेरिया दिन; चला करुया मलेरियाचा नायनाट

World Malaria Day : जागतिक आरोग्य संघटनेने दरवर्षी २५ एप्रिल रोजी जागतिक मलेरिया दिवस साजरा करण्याची घोषणा केली.

136
World Malaria Day : जागतिक मलेरिया दिन; चला करुया मलेरियाचा नायनाट
World Malaria Day : जागतिक मलेरिया दिन; चला करुया मलेरियाचा नायनाट

मलेरिया (World Malaria Day) हा एक परोपजीवी रोग असल्याने त्याचा संसर्ग झपाट्याने पसरतो, जो विशिष्ट प्रजातीच्या डासांच्या चाव्याव्दारे संक्रमित होतो. या आजाराबाबत थोडासा निष्काळजीपणाही रुग्णासाठी घातक ठरू शकतो. या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण आणि त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) (WHO) दरवर्षी २५ एप्रिल रोजी जागतिक मलेरिया दिवस साजरा (World Malaria Day) करण्याची घोषणा केली.

(हेही वाचा- Cylinder explosion: सायन कोळीवाडा परिसरात गॅस सिलेंडरच्या स्फोटात एकाचा मृत्यू, २ गंभीर जखमी)

वाचकहो, २००८ मध्ये पहिल्यांदा जागतिक मलेरिया दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सन २००० मध्ये जागतिक मलेरिया दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. मात्र हा आफ्रिका मलेरिया दिवस म्हणून ओळखला जातो. यानंतर २००८ मध्ये त्याचे नाव बदलून जागतिक मलेरिया दिन ठेवण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) आयोजित केलेल्या जागतिक आरोग्य संमेलनाच्या ६० व्या सत्रादरम्यान हा बदल करण्यात आला. (World Malaria Day)

जागतिक मलेरिया दिनाचे उद्दिष्ट लोकांना (World Malaria Day) मच्छरांपासून संरक्षणासाठी मच्छरदाणी वापरणे, मलेरियाविरोधी फवारणी आणि मलेरियाच्या संशयित प्रकरणांवर त्वरित उपचार करणे याबद्दल जागृत करणे, असे आहे. WHO ने २०१६ मध्ये २०३० पर्यंत मलेरियाचे रुग्ण ९० टक्क्यांनी कमी करण्याची योजना आखली आहे. (World Malaria Day)

(हेही वाचा- Bulletproof Jacket: भारतीय सैनिकांसाठी बनवले विशेष बुलेट प्रूफ जॅकेट, काय आहे वैशिष्ट्य; जाणून घ्या)

आपण स्वतः नागरिक म्हणून मलेरियाला हरवण्याचा प्रयत्न करु शकतो. उन्हाळा सुरू होताच, ज्या ठिकाणी सांडपाणी जमा होते त्या ठिकाणांची स्वच्छता करून ते खड्डे भरण्यासाठी एक गट तयार केला जाऊ शकतो. याच्या मदतीने मलेरिया निर्माण करणाऱ्या डासांवर नियंत्रण मिळवता येईल. लोकांना मलेरियाचे प्रतिबंध, लक्षणे आणि उपचारांबद्दल शिक्षित करण्यासाठी कार्यशाळा, चर्चासत्रे किंवा आरोग्य शिबिरे आयोजित करू शकतो., दरवर्षी जागतिक मलेरिया दिनानिमित्त वेगळी थीम ठेवली जाते. या वर्षाची (२०२४) थीम आहे, ’मलेरियाविरूद्धच्या लढ्याला गती देणे’. (World Malaria Day)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.