Cylinder explosion: सायन कोळीवाडा परिसरात गॅस सिलेंडरच्या स्फोटात एकाचा मृत्यू, २ गंभीर जखमी

घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर स्फोट झाल्याचं समोर आलं आहे.

147
Cylinder explosion: सायन कोळीवाडा परिसरात गॅस सिलेंडरच्या स्फोटात एकाचा मृत्यू, २ गंभीर जखमी

मुंबईतील सायन कोळीवाड्यातील कोक्रियागर, जय महाराष्ट्र नगर झोपडपट्टी परिसरात सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात एका महिलेचा मृत्यू, तर ३ जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Cylinder explosion)

घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर स्फोट झाल्याचं समोर आलं आहे. जखमी व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. सायन कोळीवाडामधील जय महाराष्ट्र नगर परिसरात रात्री बाराच्या सुमारास हा सिलिंडरचा स्फोट झाला. परिसरातील रहिवाशांनी घडलेल्या घटनेविषयी अग्निशमन दल आणि अँटॉप हिल पोलिसांना माहिती दिली. पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आली आहे. या स्फोटात एका ७० वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला, २ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

(हेही वाचा – Bulletproof Jacket: भारतीय सैनिकांसाठी बनवले विशेष बुलेट प्रूफ जॅकेट, काय आहे वैशिष्ट्य; जाणून घ्या)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.