Bulletproof Jacket: भारतीय सैनिकांसाठी बनवले विशेष बुलेट प्रूफ जॅकेट, काय आहे वैशिष्ट्य; जाणून घ्या

127
Bulletproof Jacket: भारतीय सैनिकांसाठी बनवले विशेष बुलेट प्रूफ जॅकेट, काय आहे वैशिष्ट्य; जाणून घ्या

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) देशातील आजवरचे सर्वात हलके बुलेटप्रूफ जॅकेट तयार केले आहे. या जॅकेटची चाचणीही नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. एकापाठोपाठ ६ स्नायपर बुलेट शूट केल्यानंतरही या जॅकेटमध्ये एकही गोळी शिरली नाही, हे या जॅकेटचे वैशिष्ट्य, ठरले आहे. (Bulletproof Jacket)

पॉलिमर बॅकिंग आणि मोनोलिथिक सिरॅमिक प्लेटपासून ते बनविण्यात आले आहे. जॅकेटचे स्वतंत्र डिझाईन सैनिकांना मजबूत संरक्षण देईल. कानपूर येथील ‘डीआरडीओ’च्या डिफेन्स मटेरियल अँड स्टोअर्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटच्या देखरेखीखाली हे जॅकेट तयार झाले. चंदीगड येथे जॅकेटची चाचणी घेण्यात आली. ती यशस्वीरित्या पार पडली. (Bulletproof Jacket)

(हेही वाचा – अजित पवारांच्या पत्नी Sunetra Pawar यांना मोठा दिलासा; २५ हजार कोटींच्या बँक घोटाळ्यात क्लीन चिट)

जॅकेट परिधान करणे सैनिकांना सोयीचे
कुठल्याही मोहिमेदरम्यान हे जॅकेट परिधान करणे सैनिकांना सोयीचे आणि सुरक्षित असेल. जॅकेटच्या आयसीडब्ल्यू हार्ड आर्मर पॅनेलची (एचएपी) एरियल डेन्सिटी (हवाई घनता) ४० कि.ग्रॅ./एम २ आणि स्टँडअलोन एचएपीची एरियल डेन्सिटी ४३ कि.ग्रॅ./एम २ हूनही कमी आहे, असे जॅकेटच्या वजनासंदर्भातील माहिती देताना संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

कुणावरही मदतीसाठी विसंबून राहावे लागणार नाही
संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाकडे भारत वेगाने पुढे निघालेला आहे. आमच्यावर युद्ध लादण्याचा प्रयत्न होत असेल, तर आता आम्हाला कुणावर मदतीसाठी विसंबून राहावे लागणार नाही. संरक्षण, बचाव, चढाई, आक्रमणासाठी आम्ही आता तत्पर आहोत. कुठल्याही क्षणी युद्धाला तयार आहोत, अशी माहिती लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी दिली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.