Divya Deshmukh : विश्वचषक विजेत्या दिव्या देशमुखची आतापर्यंतची बुद्धिबळातील कामगिरी  

Divya Deshmukh : १९ व्या वर्षी महिला विश्वचषक जिंकण्याची कामगिरी दिव्याने केली आहे      

189
Divya Deshmukh : विश्वचषक विजेत्या दिव्या देशमुखची आतापर्यंतची बुद्धिबळातील कामगिरी  
Divya Deshmukh : विश्वचषक विजेत्या दिव्या देशमुखची आतापर्यंतची बुद्धिबळातील कामगिरी  
  • ऋजुता लुकतुके

१९ वर्षीय दिव्या देशमुख नुकतीच भारताची पहिली महिला फिडे विश्वचषक विजेती बुद्धिबळपटू ठरली आहे. जॉर्जियात झालेल्या अंतिम फेरीत तिने भारताच्याच अनुभवी कोनेरु हम्पीला टायब्रेकरमध्ये हरवलं. लहान वयात विश्वचषक जिंकण्याबरोबरच ग्रँडमास्टरचा किताबही तिने जिंकला आहे. भारताची ती चौथी महिला ग्रँडमास्टर ठरली आहे. स्पर्धा सुरू झाली तेव्हा दिव्या देशमुखचं जागतिक रँकिंग १५ होतं. स्पर्धेत तिने आपल्यापेक्षा क्रमवारीत अव्वल असलेल्या खेळाडूंना हरवत अंतिम फेरी गाठली. आणि तिथे भारताच्याच अव्वल हम्पीचा पराभव केला. दोन्ही पारंपरिक डाव बरोबरीत सुटल्यावर टायब्रेकरच्या दुसऱ्या डावांत मात्र दिव्याने अनुभवी हम्पीला जेरीला आणलं. वेळेच्या बाबतीत मागे पडलेल्या हम्पीकडून चुका होत गेल्या. आणि त्याचाच फायदा घेत दिव्याने विजय साकारला.

(हेही वाचा – Ind vs Eng, 5th Test : ओव्हल कसोटीत कुलदीप, आकाशदीप खेळणार का?  )

दिव्याने संपूर्ण स्पर्धेत कणखर आणि स्थिर मनोवृत्तीचं प्रदर्शन घडवलं. सामन्यानंतर आपल्या भावनांना वाट मोकळी करून देणारी दिव्या सामन्या दरम्यान मात्र कायम शांत होती.

भारतीय बुद्धिबळपटू सध्या जागतिक स्तरावर सुरेख कामगिरी करत आहेत. आताही भारताच्या एकूण तीन महिला खेळाडूंनी फिडे महिला विश्वचषकाच्या उपान्त्य फेरीत प्रवेश केला होता. या विजेतेपदाबरोबरच दिव्या आणि हम्पी या दोघींही कँडिडेट्स चषकासाठी पात्र ठरल्या आहेत.या विजेतेपदाच्या निमित्ताने दिव्या देशमुखच्या इतर कामगिरीचा आढावा घेऊया,

  • महिला फिडे बुद्धबळ विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला
  • बुडापेस्ट ऑलिम्पियाडमध्ये दुहेरी सुवर्ण (सांघिक व वैयक्तिक)
  • ग्रँडमास्टर किताब जिंकणारी चौथी भारतीय महिला
  • १९ वर्षांच्या आत ग्रँडमास्टर किताब जिंकणारी हम्पी नंतरची दुसरी भारतीय महिला
  • ग्रँडमास्टर किताब जिंकणारी जागतिक स्तरावरील  ४४ वी महिला बुद्धिबळपटू
  • भारताची एकूण ८८ वी ग्रँडमास्टर

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.