Dinesh Karthik : यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकची ही शेवटची आयपीएल?

दिनेश आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाही अलविदा करण्याच्या तयारीत. 

108
Dinesh Karthik : यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकची ही शेवटची आयपीएल?
  • ऋजुता लुकतुके

२२ मार्चपासून आयपीएलचा २०२४ चा हंगाम सुरू होत आहे. पण, हा हंगाम कदाचित बंगळुरूचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकसाठी (Dinesh Karthik) शेवटचा असेल. ३८ वर्षीय दिनेशने आयपीएल आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घ्यायची ठरवलेलं दिसतंय. बीसीसीआयमधील सूत्रांनी याविषयीची बातमी दिली आहे. महेंद्रसिंग धोनीच्या काळात खेळत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिनेशला भारताकडून फारशी संधी मिळाली नाही. पण, आयपीएलमध्ये तो त्याचे नेतृत्व गुण, वेगाने धावा जमवण्याचं कौशल्य आणि कसोटीच्या क्षणी डोकं शांत ठेवून खेळण्याच्या गुणांसाठी ओळखला जातो. (Dinesh Karthik)

२००८ पासून तो ६ विविध संघांसाठी आयपीएलमध्ये खेळला आहे. सुरुवातीला दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने त्याला विकत घेतलं होतं. किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईटरायडर्स, गुजरात लायन्स आणि शेवटी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांकडून तो खेळला आहे. (Dinesh Karthik)

(हेही वाचा – IPL 2024 : आयपीएलच्या नवीन हंगामासाठी मुंबई इंडियन्सची नवीन जर्सी)

यष्टीरक्षक म्हणूनही दिनेश कार्तिकने मिळवले १७० बळी 

२०२२ चा हंगाम त्याच्यासाठी विशेष संस्मरणीय ठरला. यात त्याने १६ सामन्यांत ३३० धावा केल्या त्या ५५ ची सरासरी आणि १८२ पेक्षा जास्तच्या स्ट्राईकरेटने. फक्त आयपीएलच नाही तर भारतासाठीही त्याने योगदान दिलं आहे. भारताकडून तो २६ कसोटी सामने, ९४ एकदिवसीय सामने आणि ६० टी-२० सामने खेळला आहे. क्रिकेटची चांगली जाण, मिळालेल्या छोट्या-छोट्या संधींचं सोनं करण्यासाठी घेतलेली मेहनत आणि क्रिकेटवरील प्रेमापोटी कुठलीही स्पर्धा मनापासून खेळण्याची तयारी हे दिनेश कार्तिकचे (Dinesh Karthik) गुण आहेत. म्हणूनच अलीकडेही डी वाय पाटील टी-२० स्पर्धेत तो झोकून देऊन खेळताना दिसला. (Dinesh Karthik)

आपल्या कारकीर्दीत दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) यष्टीरक्षक म्हणून महेंद्रसिंग धोनीशी स्पर्धा करावी लागली. त्यामुळे अर्थातच, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला संधी कमी मिळाल्या. पण, यातही एक कसोटी शतक त्याच्या नावावर आहे. आणि प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये ४० च्या वर सरासरी तो राखून आहे. यष्टीरक्षक म्हणूनही तीनही प्रकारात मिळून त्याने १७० बळी मिळवले आहेत. (Dinesh Karthik)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.