Asia Cup 2025 : महेंद्रसिंग धोनीच्या नावावरचा आशिया चषकातील ‘हा’ विक्रम अजूनपर्यंत आहे अबाधित

Asia Cup 2025 : भारताने एकूण ८ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.

218
Asia Cup 2025 : महेंद्रसिंग धोनीच्या नावावरचा आशिया चषकातील 'हा' विक्रम अजूनपर्यंत आहे अबाधित
  • ऋजुता लुकतुके

आशिया चषकात भारतीय संघाचा वरचष्मा कायमच राहिला आहे. एकूण आठवेळा भारताने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावलं आहे. ही स्पर्धा सुरू झाल्यापासून ज्यांनी ज्यांनी भारतीय एकदिवसीय संघांचं नेतृत्व केलं, त्या प्रत्येकाला विजेतेपदाचा चषक उंचावता आला आहे. पण, यातही धोनीच्या नावे असा विक्रम आहे जो कुणीही मोडू शकणार नाही. धोनीने एकदिवसीय आणि टी-२० अशा दोन्ही प्रकारात ही स्पर्धा जिंकली आहे. पूर्वी आशिया चषक हा एकदिवसीय क्रिकेटसाठी होत होता. अलीकडे ही स्पर्धा टी-२० करण्या आली आहे. (Asia Cup 2025)

(हेही वाचा – हे अफगाणिस्तान, पाकिस्तान नाही; Delhi Airport वरील दृश्य पहा, धर्मांधांनी पसरल्या पथाऱ्या)

२०१० मध्ये धोनीने पहिल्यांदा आशिया चषक उंचावला तेव्हा ती एकदिवसीय स्पर्धा होती. अंतिम फेरीत श्रीलंकेचा ८१ धावांनी पराभव करत भारताने ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर सहा वर्षांनी २०१६ मध्ये धोणीने पुन्हा एकदा चषक उंचावला आणि यावेळी टी-२० स्पर्धा होती. बांगलादेशचा ८ गडी राखून पराभव करत भारताने विजेतेपद पटकावलं होतं. (Asia Cup 2025)

(हेही वाचा – हिंसाचाराच्या छायेत नेपाळ; PM Narendra Modi यांचा शांततेचा संदेश)

धोनीच्या कामगिरीची पुनरावृत्ती त्यानंतर कुणीही केलेली नाही. दुसरीकडे, मोहम्मद अझरुद्दिन आणि रोहित शर्मा हे आणखी दोन कर्णधार या स्पर्धेत यशस्वी ठरले आहेत. दोघांनी प्रत्येकी दोनदा चषक उंचावला आहे. पण, अझरुद्दिनने दोन्ही विजेतेपदं एकदिवसीय क्रिकेटमध्ये तर रोहितने टी-२० मध्ये मिळवली आहेत. अझरुद्दिनच्या नेतृत्वाखाली भारताने १९९० आणि त्यानंतर १९९५ मध्ये आशिया चषक जिंकला होता. तर रोहित शर्माने २०१८ आणि २०२३ मध्ये भारताला चषक जिंकून दिला आहे. १९८४ मध्ये स्पर्धा सुरू झाल्यापासून भारताने सर्वाधिक ८ वेळा विजेतेपद पटकावलं आहे. तर श्रीलंकेनं मागोमाग ६ वेळा ही स्पर्धा जिंकली आहेत. १९८४ ची पहिलीच स्पर्घा भारताने सुनील गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली जिंकली होती. (Asia Cup 2025)

(हेही वाचा – Nepal Army : नेपाळच्या गल्लीबोळात लष्कराचे नियंत्रण; आंदोलकांशी चर्चा होणार)

आशिया चषक स्पर्धेतील सर्वाधिक विजेतेपदं

संघ

विजेतेपदांची संख्या

वर्ष

भारत

१९८४, १९८८, १९९०-९१, १९९५, २०१०, २०१६, २०१८, २०२३

श्रीलंका

१९८६, १९९७, २००४, २००८, २०१४, २०२२

पाकिस्तान

२०००, २०१२

 

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.