Fastest Half Century by Indian : रेल्वेच्या आशुतोष शर्माने मोडला युवराज सिंगचा ‘हा’ विक्रम

भारतीय क्रिकेटमध्ये मंगळवारी रेल्वेचा मधल्या फळीतील फलंदाज आशुतोष शर्माच्या नावाची चर्चा होती.

24
Fastest Half Century by Indian : रेल्वेच्या आशुतोष शर्माने मोडला युवराज सिंगचा ‘हा’ विक्रम
Fastest Half Century by Indian : रेल्वेच्या आशुतोष शर्माने मोडला युवराज सिंगचा ‘हा’ विक्रम
  • ऋजुता लुकतुके

रेल्वेच्या आशुतोष शर्माने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत युवराज सिंगचा १६ वर्षं अबाधित असलेला एक विक्रम मोडला आहे. भारतीय क्रिकेटमध्ये मंगळवारी रेल्वेचा मधल्या फळीतील फलंदाज आशुतोष शर्माच्या नावाची चर्चा होती. सय्यद अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत सी गटातील अरुणाचल प्रदेश विरुद्धच्या लढतीत आशुतोषने १६ वर्ष अबाधित असलेला युवराज सिंगचा एक विक्रम मोडला. (Fastest Half Century by Indian)

४ बाद १३१ अशी रेल्वेची धावसंख्या झालेली असताना २५ वर्षीय आशुतोष खेळायला आला. डावातील ३० चेंडू फक्त बाकी होते. अशावेळी आशुतोषने धुवाधार फलंदाजी करत ११ चेंडूतच अर्धशतक पूर्ण केलं. ८ षटकार आणि १ चौकाराच्या सहाय्याने त्याने ५३ धावा केल्या त्या १२ चेंडूत. त्याचा स्ट्राईक रेट होता ४४१.६६ धावांचा. विशेष म्हणजे रेल्वेसाठी आशुतोषचा हा फक्त दुसरा सामना होता. (Fastest Half Century by Indian)

(हेही वाचा – EWS scheme : आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत ‘इतक्या’ जणांना मिळाला लाभ)

अखेर आशुतोष शेवटच्या षटकात बाद झाला. पण, तोपर्यंत रेल्वे संघाने २४६ धावांची मजल मारली होती. आशुतोषने टी-२० पदार्पण २०१८ च्या हंगामात मध्यप्रदेशकडून केलं आहे. २०१९ मध्ये मध्यप्रदेशकडून तो टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळला. त्यानंतर तो रेल्वेच्या सेवेत रुजू झाला. (Fastest Half Century by Indian)

आशुतोष अजून प्रथमश्रेणी क्रिकेट खेळलेला नाही. युवराज सिंगने १६ वर्षांपूर्वी टी-२० विश्वचषकात १२ चेंडूत धावा केल्या होत्या त्या इंग्लिश संघाविरुद्ध. मध्यंतरी नेपाळच्या दिपेश सिंगने आशियाई खेळांदरम्यान युवराजचा हा विक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर मागे टाकला होता. आता भारतातही हा विक्रम मोडला आहे. (Fastest Half Century by Indian)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.