Ind vs Ban : बांगलादेश विरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने केली नेट्समध्ये गोलंदाजी

भारतीय क्रिकेट संघ आता बांगलादेश विरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज होत आहे.

29
Ind vs Ban : बांगलादेश विरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने केली नेट्समध्ये गोलंदाजी
Ind vs Ban : बांगलादेश विरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने केली नेट्समध्ये गोलंदाजी
  • ऋजुता लुकतुके

भारतीय क्रिकेट संघ आता बांगलादेश विरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज होत आहे. स्पर्धेतील दोन धक्कादायक निकालांनंतर आता कुठलाही संघ कुठलंही आव्हान हलक्यात घेणार नाही. म्हणूनच कदाचित भारतीय कर्णधार नेट्समध्ये गोलंदाजी करताना दिसला. (Ind vs Ban)

विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा चौथा सामना १९ ऑक्टोबरला पुण्यात बांगलादेश विरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय सरावाच्या वेळी पत्रकारांना तिथे प्रवेश नव्हता. तरीही संघाचे सरावाचे काही व्हीडिओ हे व्हायरल झाले आहेत. आणि त्यातील एका व्हीडिओत चक्क कर्णधार रोहित शर्मा फिरकी गोलंदाजीचा सराव करताना दिसतोय. (Ind vs Ban)

अश्विनच्या मार्गदर्शनाखाली रोहितने हार्दिक पांड्या आणि इतर फलंदाजांनाही गोलंदाजी केली आणि यात हार्दिकने रोहितला दोन चौकारही लागवले. (Ind vs Ban)

(हेही वाचा – RBI Fine : RBI ची मोठी कारवाई, ‘या’ दोन मोठ्या खासगी बँकेला ठोठावला ‘इतक्या’ कोटींचा दंड)

आतापर्यंत भारतीय संघाने या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला १९९ तर पाकिस्तानच्या संघाला १९२ धावांमध्ये रोखलं आहे आणि ही कामगिरी करताना संघाच्या फिरकीपटूंनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. असं असताना रोहितने ऑफ-ब्रेक गोलंदाजीचा सराव केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होतंय. (Ind vs Ban)

विशेष म्हणजे रोहितने एका युट्यूबला दिलेल्या मुलाखतीत या स्पर्धेपूर्वी फिरकी गोलंदाजीवरील त्याचं प्रेम बोलून दाखवलं होतं. तो म्हणाला होता की, ‘गोलंदाजी मला आवडते. मी सुरुवातीला नियमितपणे निदान नेट्समध्ये गोलंदाजी करायचो. पण, बोटाच्या दुखापतीनंतर मला गोलंदाजी सोडावी लागली. पण, आता नेट्समध्ये मी पुन्हा गोलंदाजी करणार आहे.’ (Ind vs Ban)

रोहितने आयपीएलमध्येही गोलंदाजी केलेली आहे आणि २००९ च्या हंगामात डेक्कन चार्जर्स कडून खेळताना त्याने हॅट-ट्रीकही केली होती. अर्थात, रोहित सामन्या दरम्यान गोलंदाजी करण्याची शक्यता कमीच आहे. पण, त्याचे व्हीडिओ व्हायरल झाल्यावर इंटरनेटवर त्याची भरपूर चर्चा रंगली आहे आणि मिम्सही निघाले आहेत. (Ind vs Ban)

एका चाहत्याने लिहिलंय की, ‘बांगलादेश या आव्हानासाठी तयार आहे का?’

‘पाच विकेटची प्रतीक्षा आहे’

‘नवीन अष्टपैलू खेळाडू’

अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. (Ind vs Ban)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.