Ashes 2023 : ‘या’ कारणासाठी आयसीसीने केली इंग्लंड-ऑस्ट्रेलियावर मोठी कारवाई

दोन्ही संघांना त्यांच्या मॅच फीच्या पाच टक्के दंड ठोठावण्यात आला आहे

109
Ashes 2023 : 'या' कारणासाठी आयसीसीने केली इंग्लंड-ऑस्ट्रेलियावर मोठी कारवाई

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (Ashes 2023) यांच्यातील कसोटी मालिका नुकतीच संपली. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा ४९ धावांनी पराभव केला आणि अॅशेस मालिकेत बरोबरी साधली. मात्र ऑस्ट्रेलिया गतविजेती टीम असल्याने कांगारूंनी ट्रॉफी राखली. अशातच या मालिकेनंतर आयसीसीने दोन्ही संघावर मोठी कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार आयसीसीने ‘स्लो ओव्हर रेट’साठी दोन्ही संघांवर कारवाई करत त्यांना दंड ठोठावला आहे.

त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये या दोन्ही टीमचे मोठे नुकसान झाले आहे. आयसीसीच्या (Ashes 2023) या कारवाईमुळे केवळ गुणांमध्येच नाही, तर विजयाच्या टक्केवारीतही मोठी घसरण झाली आहे. ॲशेसदरम्यान स्लो ओव्हर रेटमुळे आयसीसीने हे पाऊल उचलले आहे.

आयसीसीने अधिकृत वेबसाइटवर (Ashes 2023) पोस्ट केलेल्या एका प्रेस रिलीजमध्ये, बुधवारी (२ ऑगस्ट) सांगितले की, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियालाॲशेसमध्ये निर्धारित वेळेत कमी टाकलेल्या प्रत्येक षटकासाठी एक डब्ल्यूटीसी पॉईंट आणि मॅच फीची कपात करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ट्रकचा अपघात, एकाचा मृत्यू)

आयसीसीने म्हटले आहे की, “सुधारित नियमांनुसार, दोन्ही संघांना त्यांच्या मॅच फीच्या (Ashes 2023) पाच टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर निर्धारित वेळेत कमी टाकलेल्या प्रत्येक षटकासाठी एक डब्ल्यूटीसी पॉइंट कट केला आहे.” ॲशेसच्या चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला स्लो ओव्हर रेटसाठी १० गुणांची कपात करण्यात आली. यजमान इंग्लंडला मात्र ॲशेसमध्ये (Ashes 2023) अधिक त्रास सहन करावा लागला आणि पाचपैकी चार कसोटी सामन्यांमध्ये स्लो ओव्हर-रेटसाठी १९ गुणांची कपात करण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.