National Productivity Day : राष्ट्रीय उत्पादकता दिन म्हणजे काय आणि तो केव्हा साजरा केला जातो?

187
National Productivity Day 2024 राष्ट्रीय उत्पादकता परिषद (NPC) च्या स्थापनेच्या स्मरणार्थ दरवर्षी भारतात राष्ट्रीय उत्पादकता दिन (National Productivity Day) साजरा केला जातो. उत्पादकता वाढवण्याबद्दल राष्ट्रीय जागरूकता निर्माण करणे हे NPC चे ध्येय आहे. “उत्पादकता” म्हणजे अशा गोष्टींचे उत्पादन ज्या यापूर्वी कधीही करता आल्या नाहीत.

एक आठवडा “राष्ट्रीय उत्पादकता सप्ताह” म्हणून साजरा

देशातील सर्व क्षेत्रातील उत्पादकता आणि गुणवत्तेचा विचार करण्यासाठी वर्षातील एक आठवडा “राष्ट्रीय उत्पादकता सप्ताह” म्हणून साजरा केला जातो. याची सुरुवात National Productivity Day म्हणजेच राष्ट्रीय उत्पादकता दिनापासून झाली. हा राष्ट्रीय उत्पादकता दिन कधी साजरा केला जातो आणि त्याचा उद्देश काय आहे? चला जाणून घेऊया:
नाविन्यता, कार्यक्षमता आणि उत्पादकता याबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढवणे हा यामागील उद्देश आहे. राष्ट्रीय उत्पादकता दिनानिमित्त, लोक सकारात्मक सवयी लावून घेऊ शकतात ज्यामुळे उत्पादकता वाढेल आणि सर्वसाधारणपणे जीवन गुणवत्ता वाढवण्यात मदत होईल. भारतात दरवर्षी १२ फेब्रुवारीला राष्ट्रीय उत्पादकता दिन साजरा केला जातो.

भारतीय राष्ट्रीय उत्पादकता परिषदेची स्थापना

या दिवशी १९५८ साली भारतीय राष्ट्रीय उत्पादकता परिषदेची स्थापना करण्यात आली. NPC ही भारतातील उत्पादकतेला चालना देणारी राष्ट्रीय स्तरावरील संस्था आहे. राष्ट्रीय उत्पादकता परिषद ही वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाअंतर्गत एक स्वायत्त नोंदणीकृत संस्था आहे. NPC (राष्ट्रीय उत्पादकता परिषद) उत्पादकतेच्या क्षेत्रात संशोधन करण्याबरोबरच औद्योगिक अभियांत्रिकी, कृषी-व्यवसाय, आर्थिक सेवा, गुणवत्ता व्यवस्थापन, मानव संसाधन व्यवस्थापन, माहिती या क्षेत्रांमध्ये सरकारी आणि सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील संस्थांना मदत पुरवते. तंत्रज्ञान, तंत्रज्ञान व्यवस्थापन, ऊर्जा व्यवस्थापन, पर्यावरण व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रांमध्ये सल्ला आणि प्रशिक्षण सेवा प्रदान करत आहे.  “Artificial Intelligence (AI)- Productivity Engine for Economic Growth.” ही २०२४ ची थीम आहे. उत्पादकतेमध्ये आता यापुढे नवीन तंत्रज्ञानाची भर पडणार आहे. हे लक्षात घेऊनच Artificial Intelligence (AI) ला चालना देण्यासाठी ही थीम ठेवण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.