गुलामगिरीची प्रथा मोडून काढण्यासाठी बलिदान देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Abraham Lincoln

228
अब्राहाम लिंकन (Abraham Lincoln) यांचा जन्म १२ फेब्रुवारी १८०९ साली एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या आजोबांच्या नावावरून अब्राहम लिंकन हे त्यांचे नाव ठेवण्यात आले होते. त्यांच्या वडिलांचे नाव थॉमस लिंकन आणि आईचे नाव नॅन्सी हँक्स असे होते. ते दोघेही शिकलेले नव्हते. लिंकन लहान असताना त्यांच्या गरीब परिस्थितीचे बरेच वर्णन तुम्ही वाचले असेल किंवा ऐकले असेल. पण खरंतर ते ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणचे ते सर्वांत जास्त श्रीमंत कुटुंब होते.
लिंकन (Abraham Lincoln) यांच्या वडिलांनी १८०८ साली केंटकी येथे ३४८ एकरचे स्प्रिंग फार्म  २०० डॉलर्सना विकत घेतले होते. ते स्प्रिंग फार्म सध्या एक राष्ट्रीय स्मारक म्हणून जातं केलेले आहे. त्या वेळेस गुलामगिरीच्या विरोधात मुख्य बाप्टिस्ट चर्चमधून काही लोकांचा एक समूह बाहेर पडला होता आणि त्या लोकांनी एक वेगळ्या बाप्टिस्ट चर्चची स्थापना केली होती. लिंकन यांचे वडील त्याच नवीन बाप्टिस्ट चर्चचे सदस्य होते. याचाच अर्थ गुलामगिरीच्या विरोधात लढण्याचा वारसा त्यांना आपल्या वडिलांकडूनच मिळालाय असं म्हणता येईल. तरीसुद्धा पुढे आपल्या आयुष्यात ते कोणत्याही चर्चचे सदस्य झाले नाहीत.
अब्राहम लिंकन (Abraham Lincoln) सात वर्षांचे होते तेव्हा आर्थिक परिस्थिती आणि केंटकी येथील गुलामगिरीची पद्धत या गोष्टीला कंटाळून त्यांना आपले राहते घर सोडावे लागले होते. त्यांचे कुटुंब इंडियाना येथील स्पेन्सर काऊंटी येथे शिफ्ट झाले. लिंकन नऊ वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या आईला दुधातून विषबाधा झाली होती. त्यात तिचा मृत्यू झाला. काही काळानंतर त्यांच्या वडिलांनी सारा बुश जॉस्टीन नावाच्या महिलेशी दुसरे लग्न केले. सारा यांनी सावत्र आई असूनही लिंकन यांना खूप प्रेमाने वाढवले.

लहानमोठे व्यवसाय केले

सुरुवातीच्या काळात लिंकन (Abraham Lincoln) यांनी अनेक लहानमोठे व्यवसाय केले. त्यांनी मद्य विकण्याचा परवाना काढला आणि ते मद्याविक्रीचा व्यवसाय करायला लागले. या व्यवसायात त्यांना बऱ्याच प्रमाणात आर्थिक फायदा झाला. लिंकन यांना वाचनाची खूप आवड होती. त्याकाळी त्यांनी सर विल्यम यांच्या ब्लॅकस्टोनच्या इंग्रजी कायद्याविषयीचे पुस्तक वाचले होते. त्या पुस्तकापासून प्रेरणा घेऊन लिंकन यांनी आपला वकिलीचा अभ्यास सुरू केला. १८३७ साली त्यांनी इलिनॉय या राज्यात वकिलीची प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती आणखी सुधारली.  तेव्हा ते त्याच राज्यातल्या स्प्रिंगफिल्ड या गावात शिफ्ट झाले. लवकरच अब्राहम लिंकन हे नामांकित वकीलांच्या यादीत आले.

विधिमंडळात गुलामगिरीच्या प्रथेविरोधात पहिल्यांदा निषेध मांडला

१८३४ सालापासून त्यांजी इलिनॉय राज्याच्या विधिमंडळात प्रतिनिधी म्हणून काम करायला सुरुवात केली. त्याच कालावधीत त्यांनी व्हिग पक्षाचे सभागृहातील नेते म्हणूनही आपले काम सांभाळले. याच पदावर असताना १८३७ साली विधिमंडळात गुलामगिरीच्या प्रथेविरोधात पहिल्यांदा निषेध मांडला आणि गुलामगिरीच्या या प्रथेला अन्यायकारक आणि चुकीचे ध्येय असलेली प्रथा असे म्हटले. पुढे त्यांनी विल्यम हर्नडॉन नावाच्या व्यक्तीबरोबर पार्टनरशिपमध्ये आपल्या वकिली व्यवसायाची सुरुवात केली. त्यानंतर १८५६ साली या दोघांनीही रिपब्लिकन नावाच्या नवीन पक्षात प्रवेश केला. अब्राहम लिंकन (Abraham Lincoln) हे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचे १६ राष्ट्राध्यक्ष होते. लिंकन यांचा गुलामगिरी प्रथेला कडा विरोध होता. म्हणूनच गुलामगिरीचे समर्थन करणाऱ्या लोकांनी त्यांना मारण्यासाठी १४ एप्रिल १८६५ साली त्यांच्यावर गोळी झाडली. त्यामुळे ते तात्काळ कोमामध्ये गेले आणि १५ एप्रिल १८६५ साली त्यांचा मृत्यू झाला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.