Gyanvapi Case : ज्ञानवापीच्या शिलालेखांत आढळतो उत्तर आणि दक्षिण भारतीय संस्कृतीचा संगम

Gyanvapi Case : बांधकामाचे सर्वेक्षण करतांना १२ व्या आणि १७ व्या शतकातील संस्कृत आणि द्रविड या दोन्ही भाषांमधील शिलालेख आढळले. हे शिलालेख उत्तर भारत आणि दक्षिण भारत येथील संस्कृतींचे विभाजन नव्हे, तर सांस्कृतिक एकत्रीकरण दर्शवतात.

215
Gyanvapi Case : ज्ञानवापीच्या शिलालेखांत आढळतो उत्तर आणि दक्षिण भारतीय संस्कृतीचा संगम
Gyanvapi Case : ज्ञानवापीच्या शिलालेखांत आढळतो उत्तर आणि दक्षिण भारतीय संस्कृतीचा संगम

सायली डिंगरे

वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या आवारातील भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या (ASI) अहवाला सिद्ध झाले आहे की, ज्ञानवापीच्या जागी पूर्वी एक मोठे हिंदू मंदिर होते. ते नागर शैलीतील मंदिर होते, असे वर्णन अहवालांत आढळते. या अहवालात मंदिराच्या ४ स्तंभांपासून ते मंदिराच्या रचनेपर्यंतचे वर्णन करण्यात आले आहे. (Gyanvapi Case)

ज्ञानवापी परिसरात पुरातत्व विभागाने (Archaeological Survey of India) केलेल्या सर्वेक्षणाच्या (ASI) अहवालाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या अहवालाने उत्तर भारत (North India) आणि दक्षिण भारत (South India), आर्य आणि द्रविड संस्कृती (Aryan-Dravidian divide) अशा प्रकारे विभाजनाबद्दल वर्षानुवर्षे असलेल्या कहाण्या खोडून काढल्या आहेत.

(हेही वाचा – U19 World Cup 2024 : अंडर-19 विश्वचषक फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव)

१२ व्या आणि १७ व्या शतकातील सांस्कृतिक एकत्रीकरण
Gyanvapi Case : ज्ञानवापीच्या शिलालेखांत आढळतो उत्तर आणि दक्षिण भारतीय संस्कृतीचा संगम
Gyanvapi Case : ज्ञानवापीच्या शिलालेखांत आढळतो उत्तर आणि दक्षिण भारतीय संस्कृतीचा संगम

ज्ञानवापी परिसरात असलेले विद्यमान पुरावे आणि आधीपासून अस्तित्वात असलेल्या बांधकामाचे सर्वेक्षण करतांना १२ व्या आणि १७ व्या शतकातील संस्कृत आणि द्रविड या दोन्ही भाषांमधील शिलालेख आढळले. हे शिलालेख उत्तर भारत आणि दक्षिण भारत येथील संस्कृतींचे विभाजन नव्हे, तर सांस्कृतिक एकत्रीकरण दर्शवतात.

संस्कृत आणि द्रविड या दोन्ही भाषांतील शिलालेख सूचित करतात की, संस्कृतींमधला हा आध्यात्मिक संबंध कोणत्याही राजकीय किंवा भौगोलिक विभाजनापूर्वीचा आहे. ज्ञानवापीचे निष्कर्ष भारतीय उपखंडातील बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक रचनेवर प्रकाश टाकतात. येथील ३० शिलालेख इसवीसन पूर्व १७ व्या शतकातील असावेत. भारतीय इतिहास समजून घेण्यासाठी हे शिलालेख महत्त्वाचे आहेत.

उत्तर-दक्षिण भारत यांत कोणताही वाद नव्हता

अनेकदा भाषिक, सांस्कृतिक किंवा वांशिक विभागणी करण्यासाठी उत्तर आणि दक्षिण भारतातील संस्कृती वेगळी आहे, असा दावा केला जातो. ज्ञानवापी परिसरात असलेल्या दोन्ही भाषांतील शिलालेखांमुळे प्राचीन काळातील एकात्मिक समाजाचे दर्शन घडते. प्राचीन काळात दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत भाषिक विविधता स्वीकारली गेली आणि तिचा आदर केला गेला. हे शिलालेख संपूर्ण इतिहासात भारतीय उपखंडातील विविध संस्कृतींच्या संगमाबद्दल भाष्य करतात. त्यामुळे उत्तर-दक्षिण भारत यांत कोणताही वाद नव्हता, तर ते भारतविरोधी नॅरेटिव्ह आहे, हेच सिद्ध होते.

(हेही वाचा – NIA Raid in Tamil Nadu : तमिळनाडूत NIAचे 21 ठिकाणी छापे; मोबाईल, हार्डडिस्क जप्त)

शिलालेखांमध्ये आढळल्या दक्षिण भारतीय भाषा
  • शिलालेख क्र ६ मध्ये १७ व्या शतकातील तेलगू लिपीतील लिखाण आढळून येते. त्यात नारायण भटियू यांच्या मुलाच्या नावाचा उल्लेख आहे.
  • शिलालेख क्र ९ मध्ये १७ व्या शतकातील तामिळ लिपीतील ग्रंथांचा उल्लेख आहे. यावरील मजकूर स्पष्टपणे दिसत नाही; परंतु या शिलालेखात नारायणन रमण यांनी स्थापन केलेल्या धर्मादाय संस्थेचा संदर्भ आहे.
  • शिलालेख क्र १६ मध्ये संस्कृत भाषेतील नागरी लिपीतील मजकूर आहे. यावर शिवाचे एक नाव रुद्र आणि दुसऱ्या ओळीत श्रावण महिन्याचा उल्लेख आहे. पुरातत्त्वशास्त्रीय दृष्टिकोनातून हा शिलालेख इसवीसनपूर्व 17 व्या शतकातील आहे.
  • शिलालेख क्रमांक २६ मध्ये कन्नड भाषेतील मजकूर आहे. यात दोदरसैया आणि नरसराहन या दोन व्यक्तींच्या सन्मानाची नोंद आहे. हा शिलालेख 16 व्या शतकातील आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.