Vivah Muhurta 2023 : नवं वर्ष 2023 मधील लग्नाचे शुभ मुहूर्त बघा एका क्लिकवर

400

अवघ्या काही दिवसांनी नवं वर्ष सुरू होणार आहे. या नवं वर्षात तुम्हाला विवाहासाठी आवश्यक असणारे शुभ मुहूर्त माहित असल्यास ‘लगीन घाई’ करणं सोपं पडेल. हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी मुहूर्त निश्चितपणे पाहिला जातो. तर हिंदू धर्मात विवाहासाठी शुभ मुहूर्ताला विशेष महत्त्व आहे. 2023 मध्ये अनेक शुभ मुहूर्त आहेत. हिंदू कॅलेंडरनुसार 2023 मध्ये लग्नासाठी फक्त 64 शुभ मुहूर्त आहेत. त्यापैकी जानेवारीत 9, फेब्रुवारीत 13, मार्चमध्ये 6, मेमध्ये 13 जूनमध्ये 11, नोव्हेंबरमध्ये 5 आणि डिसेंबरमध्ये 7 विवाह शुभ मुहूर्त आहेत.

(हेही वाचा – … म्हणून २९ डिसेंबरपर्यंत चालणारे लोकसभा-राज्यसभेचे कामकाज अनिश्चितकाळासाठी स्थगित)

ज्योतिषशास्त्रानुसार, असे चार दिवस आहेत, ज्या दिवशी मुहूर्त न बघताही लग्न किंवा धार्मिक विधी करता येते. अक्षय तृतिया, देवउठनी एकादशी, वसंत पंचमी आणि आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील भडली नवमी या चार दिवशी तुम्हाला लग्न किंवा शुभ कार्य करताना तिथी बघायची गरज नाही. या चार दिवशी कोणताही मुहूर्त न पाहताही लग्न किंवा धार्मिक विधी करता येतो. सहसा कुंडली बघूनच शुभ मुहूर्त काढला जातो. तेव्हा नव्या वर्षात कोणत्या महिन्यात किती मुहूर्त आहे, ते जाणून घ्या…

जानेवारी 2023

15, 16, 18, 19, 25, 26, 27, 30 आणि 31 तारीख

फेब्रुवारी 2023

6, 7, 8, 9 10, 12, 13, 14, 15, 17, 22, 23 आणि 28 तारीख

मार्च 2023

1, 5,6, 9,11 आणि 13 तारीख

मे 2023

6, 8, 9, 10, 11, 15, 16, 20, 21, 22, 27, 29 आणि 30 तारीख

जून 2023

1, 3, 5, 6, 7, 11, 12, 23, 24, 26 आणि 27 तारीख

नोव्हेंबर 2023

23, 24, 27, 28 आणि 29 तारीख

डिसेंबर 2023

5, 6, 7 8, 9, 11 आणि 15 तारीख

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.