Vinoo Mankad : स्वातंत्र्यपूर्व काळातील असा भारतीय क्रिकेट कर्णधार, ज्यांचा आदर्श आजही लोक घेतात

विनू मांकड हे एक सलामीवीर फलंदाज होते आणि संथ डावखुरा ऑर्थोडॉक्स गोलंदाज होते. भारतासाठी ४४ कसोटी सामने खेळत त्यांनी ३१.४७ च्या सरासरीने २१०९ धावा केल्या आहेत.

78
Vinoo Mankad : स्वातंत्र्यपूर्व काळातील असा भारतीय क्रिकेट कर्णधार, ज्यांचा आदर्श आजही लोक घेतात

मुलवंतराय हिम्मतलाल मांकड ज्यांना “विनू” मांकड (Vinoo Mankad) म्हणून ओळखले जाते, ते भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार होते आणि १९४६ ते १९५९ दरम्यान ते भारतासाठी ४४ कसोटी सामने खेळले होते. १९५६ मध्ये त्यांनी पंकज रॉय यांच्यासोबत ४१३ धावांची विश्वविक्रमी भागीदारी केली होती. पुढे जवळजवळ ५२ वर्षे हा रेकॉर्ड कुणीही तोडला नव्हता. (Vinoo Mankad)

विशेष म्हणजे क्रिकेटमधील Mankading हे त्यांच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. ते एक सलामीवीर फलंदाज होते आणि संथ डावखुरा ऑर्थोडॉक्स गोलंदाज होते. भारतासाठी ४४ कसोटी सामने खेळत त्यांनी ३१.४७ च्या सरासरीने २१०९ धावा केल्या आहेत. तसेच २३१ हा त्यांचा सर्वोच्च स्कोअर आहे आणि त्यांनी कसोटी सामन्यांत ५ शतके झळकावली आहेत. तसेच ३२.३२ च्या सरासरीने १६२ विकेट्स देखील घेतल्या आहेत. (Vinoo Mankad)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : नाशिक लोकसभा निवडणुकीचे शिवधनुष्य महंत अनिकेत शास्त्री यांनी उचलावे; रणजित सावरकर यांचे आवाहन)

१००० धावा आणि १०० बळी घेणारे पहिले भारतीय खेळाडू

ते कोणत्याही स्थानावर येऊन फलंदाजी करु शकत होते. कसोटीमध्ये १००० धावा करणारे आणि १०० बळी घेणारे ते (Vinoo Mankad) पहिले भारतीय खेळाडू होते. कमाल म्हणजे त्या काळी त्यांनी केवळ २३ कसोटी सामन्यांमध्ये १००० धावा आणि १०० बळी घेतले. हा त्याकळचा मोठा विश्वविक्रम होता. जून २०२१ मध्ये, त्यांना ICC क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले होते. (Vinoo Mankad)

विनू मांकड यांचा जन्म १२ एप्रिल १९१७ रोजी नवानगर येथील जामनगर येथे झाला. महान फलंदाज रणजितसिंहजी यांचे पुतणे अल्बर्ट वेन्सले आणि केएस दुलीपसिंहजी यांच्याकडून त्यांनी गोलंदाजीचे प्रशिक्षण घेतले होते. BCCI द्वारे आयोजित भारतातील १९ वर्षाखालील देशांतर्गत स्पर्धा, विनू मांकड ट्रॉफी, त्यांच्या सन्मानार्थ खेळवली जाते. भारत सरकारने त्यांना १९७३ मध्ये पद्मभूषण देऊन सन्मानित केले. त्यांच्या सन्मानार्थ मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या दक्षिणेला एका रस्त्याचे नाव देण्यात आले आहे. (Vinoo Mankad)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.