Social Media: सोशल मीडियाच्या वापरात मध्य रेल्वेने पटकावले अव्वल स्थान !

104
Social Media: सोशल मीडियाच्या वापरात मध्य रेल्वेने पटकावले अव्वल स्थान !
Social Media: सोशल मीडियाच्या वापरात मध्य रेल्वेने पटकावले अव्वल स्थान !

भारतीय रेल्वे सोशल मीडियाचा (Social Media) अत्यंत कुशलतेने वापर करत आहे. रेल्वेमंत्र्यांपासून ते उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत सर्व जण सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रवाशांच्या सतत संपर्कात (Social Media) असतात. कोट्यवधी रेल्वे प्रवाशांशी सतत संपर्क (Social Media) ठेवून त्यांच्या तक्रारी, सूचना ऐकून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे रेल्वे आणि प्रवाशांमध्ये सोशल कनेक्ट तयार होण्यास मदत झाली आहे.

मध्य रेल्वे अव्वल स्थानावर

मध्य रेल्वेने सोशल मीडियाच्या (Social Media) वापरात पब्लिक ॲपवर भारतीय रेल्वेतील सर्व विभागांना मागे टाकत अव्‍वल स्थान पटकावले आहे. महिनाभरात सोशल मीडियावरील (Social Media) २९ व्‍हिडीओंना ९१ लाख ३१ हजार ३९३ व्ह्यूव मिळाले आहेत. या यादीत कोकण रेल्वे, पश्चिम रेल्वे, मेट्रो, रेलटेल आणि इतर एकूण ३४ विभाग आहेत. त्यांचेही पब्लिक ॲपवर व्हिडीओ आणि व्ह्यूवची संख्या देण्यात आली आहे. (Social Media)

मध्य रेल्वेच्या एक्स अकाऊंटवर प्रवाशांच्या तक्रारींचे निराकरणही केले जाते. याबाबत अधिकारीच उत्तर देतात. यामुळे रेल्वेच्या कामात मोठ्या प्रमाणावर पारदर्शकता आली आहे. सध्या मध्य रेल्वेच्या एक्स अकाऊंटवर ५७१ हजार फॉलोअर्स आहेत. (Social Media)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.