Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दीच्या निमित्ताने ठाणे ते दादर बाईक रॅलीसह विशेष कार्यक्रमांचे आयोजन

Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दीच्या निमित्ताने ठाणे ते दादर बाईकरॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११.०० वाजता ठाणे कारागृहामध्येही विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई येथेही सायंकाळी ७ वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

253
Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दीच्या निमित्ताने ठाणे ते दादर बाईक रॅलीसह विशेष कार्यक्रमांचे आयोजन
Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दीच्या निमित्ताने ठाणे ते दादर बाईक रॅलीसह विशेष कार्यक्रमांचे आयोजन

१४ वर्षांच्या कठोर कारावासानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांची मुक्तता झाली, तो दिवस होता ६ जानेवारी १९२४ ! (Veer Savarkar) यंदा त्या घटनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई यांच्या वतीने ठाणे कारागृह ते स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर असे बाईक रॅलीचे (bike rally) आयोजन करण्यात आले आहे. ‘ठाणे एनफिल्ड क्लब’ यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीची सुरुवात ठाणे कारागृहातून करण्यात येईल. (Swatantryaveer Savarkar Mukti Shatabdi Yatra)

लेझीम, ढोल-ताशांच्या गजरात निघणार रॅली

६ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता ठाणे कारागृहातील (Thane Central Jail) क्रांती स्तंभाजवळ राष्ट्रगीत गायनाने या रॅलीची सुरुवात करण्यात येईल. या रॅलीत स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांची प्रतिमा असलेला रथ अग्रभागी असेल. त्यानंतर लेझीम पथक, ढोल-ताशा पथकही असणार आहे. बुलेट आणि मोटरगाड्या घेऊन ठाण्यातील सावरकरप्रेमी, हिंदुत्ववादी संघटना या रॅलीत सहभागी होणार आहेत.

(हेही वाचा – Jio Financial in MF : जिओ आता लाँच करणार स्वत:चे म्युच्युअल फंड)

महिला करणार रॅलीचे नेतृत्व

ही रॅली ठाणे कारागृहातून (Thane Central Jail) निघून कोर्ट नाका-तळावपाळी-गोखले रोड-तीन हात नाका-आनंदनगर-प्रियदर्शनी-सायन ब्रिज-सेना भवन-शिवाजी उद्यान-दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात येणार आहे. सावरकर स्मारकात रॅलीची सांगता होईल. विशेष म्हणजे सौ. योगिता कारखानीस या रॅलीचे नेतृत्व करणार आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई येथेही होणार कार्यक्रम

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) येथेही सायंकाळी ७ वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार राहुल शेवाळे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिवसेना नेते विजय शिवतारे आणि अभिनेता रणदीप हुडा आदी अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

याच दिवशी रात्री ८.१५ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनपटावर आधारित ‘स्वातंत्र्यवीर’ हा लाईट अ‍ॅंड साऊंड शो आयोजित करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Veer Savarkar : पुण्यात ६ जानेवारीला स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी यात्रा)

ठाणे कारागृहात विशेष मार्गदर्शनाचे आयोजन

याच निमित्ताने ६ जानेवारी रोजी सकाळी ११.०० वाजता ठाणे कारागृहामध्येही (Thane Central Jail) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ‘स्वातंत्र्यासाठी सावरकरांनी केलेले सशस्त्र क्रांतीचे प्रयत्न आणि त्यानंतर स्थानबद्धतेत वीर सावरकरांनी (Veer Savarkar) केलेले समाजक्रांतीचे कार्य’ याविषयी माहिती देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सौरभ श्रीपाद गणपत्ये, रवी गोविंदराव विघ्ने, महेंद्र मनोहर गानू हे वक्ते संबोधित करतील. (Veer Savarkar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.