Parliament Intrusion Case : आरोपींपैकी नीलम म्हणते माझी नार्को चाचणी करू नका

संसदेतील घुसखोरी प्रकरणात अटकेत असलेल्या सहापैकी पाच आरोपींची पॉलीग्राफ आणि नार्को चाचणी केली जाणार आहे. यामध्ये घुसखोरीचा मास्टरमाइंड ललित झा, महेश कुमावत आणि अमोल शिंदे यांची पॉलीग्राफ चाचणी केली जाणार आहे.

183
Parliament Intrusion Case : आरोपींपैकी नीलम म्हणते माझी नार्को चाचणी करू नका
Parliament Intrusion Case : आरोपींपैकी नीलम म्हणते माझी नार्को चाचणी करू नका

संसदेतील घुसखोरी प्रकरणात (Parliament Intrusion Case) अटकेत असलेल्या सहापैकी पाच आरोपींची पॉलीग्राफ आणि नार्को चाचणी केली जाणार आहे. यामध्ये घुसखोरीचा मास्टरमाइंड ललित झा, महेश कुमावत आणि अमोल शिंदे यांची पॉलीग्राफ चाचणी केली जाणार आहे. आरोपी सागर शर्मा आणि मनोरंजन डी यांनी पॉलीग्राफ, नार्को एनालिसिस आणि ब्रेन मॅपिंगसाठी (Brain Mapping) सहमती दर्शवली आहे, तर आरोपी नीलम आझादने (Neelam Azad) पॉलीग्राफ चाचणीसाठी सहमती दर्शवली नाही. उपरोक्त सहा आरोपींची पोलीस कोठडी शुक्रवारी (०५ जानेवारी) संपणार होती. त्यामुळे पोलिसांनी सहाही आरोपींना पटियाला हाऊस कोर्टात हजर केले. यावेळी न्यायालयात पॉलीग्राफ चाचणीबाबत (Polygraph Test) सुनावणी झाली. या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर पटियाला हाऊस कोर्टाने सहाही आरोपींच्या पोलीस कोठडीत आठ दिवसांची वाढ केली आहे. (Parliament Intrusion Case)

दिल्ली पोलिसांनी सर्व आरोपींच्या कोठडीत वाढ करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यासोबतच आरोपींची पॉलीग्राफ, नार्को चाचणी आणि ब्रेन मॅपिंगसाठीही (Brain Mapping) अर्ज करण्यात आला होता. त्यावर न्यायालयाने आरोपीला कायदेशीर मदत करणाऱ्या वकिलांशी बोलण्यास सांगितले. (Parliament Intrusion Case)

(हेही वाचा – Attack on ED Team : पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या पथकावर प्राणघातक हल्ला)

पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी नष्ट केलेल्या मोबाईलचे सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत, तर काही डेटाही जप्त करण्यात आला आहे. तसेच अनेक तथ्ये आहेत जी आरोपींनी लपविण्याचा प्रयत्न केला आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा परिस्थितीत या सर्वांची मानसशास्त्रीय चाचणी आवश्यक आहे. आम्हाला मनोरंजन आणि सागरची नार्को चाचणी (Narco Test) करावी लागेल. (Parliament Intrusion Case)

दरम्यान आरोपींच्या वकिलांनी कोठडी वाढवण्याच्या मागणीला विरोध केला. नीलम आझादच्या (Neelam Azad) वकिलाने सांगितले की, सोशल मीडिया डेटा तपासण्यासाठी पोलीस कोठडीची गरज नाही. काही पासवर्ड लपविल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. (Parliament Intrusion Case)

काय आहे प्रकरण?

संसद हल्ल्याला २२ वर्षे पूर्ण होत असतानाच १३ डिसेंबर रोजी नव्या संसद भवनातील लोकसभा प्रेक्षक गॅलरीतून दोन युवकांनी सभागृहात उडी घेतली आणि स्मोक कँडल (Smoke candles) फोडल्या होत्या. तसेच त्यानंतर काही वेळात संसद परिसरातही अन्य काहींनी स्मोक कॅंडल (Smoke candles) फोडल्या. त्या प्रकरणी एकूण सहा जणांना ताब्यात घेण्यात आले होते. (Parliament Intrusion Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.