Veer Savarkar : वीर सावरकरप्रेमी वसंत देखणे यांचे निधन

वसंत देखणे हे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सदस्य होते.

214

वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या विचारांनी प्रभावित होऊन अभिनव भारत संघटनेत राहून राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सहभाग घेतलेले सावरकरप्रेमी वसंत देखणे यांचे ६ मार्च २०२४ रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. वसंत देखणे यांच्या पाश्चात्य त्यांच्या पत्नी ज्वाला देखणे आणि पुतण्या कॅप्टन निलेश देखणे आहेत.

(हेही वाचा Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी वर्ष आणि भागोजी कीर जयंतीनिमित्त पुतळा अनावरण सोहळ्याचे आयोजन)

अभिनव भारत संघटनेत राहून राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सहभाग

1935 मध्ये जन्मलेले, मूळचे पुण्याचे वसंत देखणे 1948 ते 1950 पर्यंत ‘अभिनव भारत’च्या युवा ब्रिगेडमध्ये राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सहभागी होते. कीर्ती महाविद्यालयात ‘अभिनव भारत’ संकल्पना पुनरुज्जीवित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे तत्कालीन मराठी साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनीही कौतुक केले होते, त्यांनी नंतर त्यांना मार्गदर्शनही केले. वसंत देखणे हे वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी विविध महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम आयोजित करत असत. नंतर ते केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात रुजू झाले आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागातून अधीक्षक म्हणून ते निवृत्त झाले.

वसंत देखणे हे स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या विचारांनी प्रभावित झाले होते. त्यांची १९५८ साली वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाली होती. वसंत देखणे हे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना भेटलेल्या आणि त्यांच्या विचारसरणीचे पालन करणाऱ्या मोजक्या लोकांपैकी एक होते. ते स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सदस्यही होते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.