म्हैस, गाय आणि आता बैलाची ‘वंदे भारतला’ टक्कर! एक्स्प्रेसचा पुढील भाग तुटला

128

देशातील सर्वात वेगवान ट्रेन वंदे भारत एक्स्प्रेस शनिवारी पुन्हा एकदा अपघाताची शिकार झाली. गुजरातमधील अतुल रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला असून, मुंबईहून गांधीनगरकडे जाणाऱ्यावंदे भारत एक्स्प्रेससमोर बैल आला आणि दोघांत जोरदार टक्कर झाली. बैलाच्या या धडकेमुळे ट्रेनच्या पुढील भागाचा चुरा झाला. मात्र, काही वेळ थांबल्यानंतर ही गाडी पुन्हा रवाना करण्यात आली. ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत तीन वेळा वंदे भारत एक्स्प्रेसला गुरांनी धडकल्याचे समोर आले आहे.

काय घडला प्रकार

अहमदाबादून निघालेली वंदे भारत एक्स्प्रेस शनिवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास अतुल स्थानक नजीक आली असता काही बैल रेल्वेमार्ग ओलांडत होते. त्यातील एकाला रेल्वेची जोरदार धडक बसली. या अपघातामध्ये एक्स्प्रेसचा पुढील भाग तुटला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी रेल्वे रुळावरून तुटलेला भाग बाजूला करून काढून गाडीत ठेवला. त्यानंतर वंदे भारत एक्स्प्रेस पुढे मार्गस्थ झाली. मात्र, अर्धा तास झालेल्या खोळंब्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण होते.

(हेही वाचा – कंगनाची राजकारणात एन्ट्री? ‘या’ जागेवर लढवणार निवडणूक!)

एका महिन्यात ४ अपघात

  • ६ ऑक्टोबर- वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईहून अहमदाबादला येत होती. यादरम्यान वटवा ते मणीनगर स्थानकाजवळ म्हशींचा कळप रेल्वे मार्गावर आला. वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसची आणि म्हशींची जोरदार धडक झाली.
  • ७ ऑक्टोबर- वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन गांधीनगरहून मुंबईला येत होती. दुपारी पावणेचारच्या सुमारास कंझरी ते आणंद दरम्यान एक गायीने गाडीला धडक दिली. त्यातही गाडीचा पुढील भाग तुटला होता.
  • ८ ऑक्टोबर – दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये अचानक बिघाड झाला. तांत्रिक बिघाडामुळे ट्रेनची चाके जाम झाली. यामुळे गाडी सुमारे ५ तास खुर्जा स्थानकावर थांबली, त्यानंतर प्रवाशांना शताब्दी एक्स्प्रेसने पाठवण्यात आले.
  • २९ ऑक्टोबर – गुजरातमधील अतुल रेल्वे स्थानकाजवळ मुंबईहून गांधीनगरकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेससमोर बैल आला आणि दोघांत जोरदार टक्कर झाली. बैलाच्या या धडकेमुळे ट्रेनच्या पुढील भागाचा चुरा झाला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.