#BoycottCadbury का होतंय ट्रेंडिंग? कॅडबरीच्या जाहिरातीशी पंतप्रधान मोदींचा काय संबंध?

115

कॅडबरी हे प्रसिद्ध आणि आयकॉनिक चॉकलेट ब्रँड. मात्र कॅडबरीने दिवाळीत केलेल्या एका जाहीरात कॅम्पेनिंगवरून या बँडला भारतात टीकेला सामोरे जावे लागल्याचे बघायला मिळत आहे. ज्यामुळे ट्विटरवर #BoycottCadbury हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. कॅडबरी किंवा अन्य ब्रँडच्या मार्केटिंग स्टाईलवर अशा प्रकारच्या जाहिरातींवर टीका होण्याची ही पहिलीच वेळ नाही. दरम्यान, ट्विटरवर युजर्स असा दावा करत आहेत की, सध्याची कॅडबरी जाहिरात वादग्रस्त आहे. कारण त्यात दामोदर या नावाचा एक गरीब दिवा विक्रेता दाखवण्यात आला आहे, ज्याला कथितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांचे नाव देऊन त्याला या जाहीरातीत मॉडेल करण्यात आले आहे.

(हेही वाचा – कंगनाची राजकारणात एन्ट्री? ‘या’ जागेवर लढवणार निवडणूक!)

दरम्यान, भगवा क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्षा, राष्ट्रीय सेविका समिती सामाजिक सदस्या आणि विहिंप नेत्या साध्वी प्राची यांनी या जाहीरातीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी असे म्हटले की, टीव्ही चॅनेल्सवरील कॅडबरी चॉकलेटची जाहिरात तुम्ही काळजीपूर्वक पाहिली आहे का? यामध्ये एक गरीब दिवा विक्रेता दाखवण्यात आला असून त्याचे नाव दामोदर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांचे नाव खराब करण्यासाठी किंवा त्यांना कमी लेखण्यासाठी हे केल्याचे दिसत आहे. चायवाले का बाप दियावाला. कॅडबरी कंपनीला लाज वाटली पाहिजे असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

कॅडबरीने भारतात वाद निर्माण करण्याची ही पहिलीच वेळ नाही. भारतातील ग्राहकांनी कॅडबरीवर कंपनीच्या सर्वात लोकप्रिय चॉकलेट उत्पादनांपैकी एक असलेल्या डेअरी मिल्कमध्ये बीफ घटक टाकल्याचा आरोप केला आहे, ज्यामुळे गेल्या वर्षी कंपनीच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर भारतात उत्पादित आणि विकली जाणारी सर्व उत्पादने शाकाहारी असल्याचे नंतर कॅडबरीने स्पष्ट केले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.