अफगाणिस्तानच्या काबूलमधील रशियन दूतावासाजवळ स्फोट; 20 लोकांचा मृत्यू

92

अफगाणिस्तानची राष्ट्रीय राजधानी काबूल येथील रशियन दूतावासाच्या परिसरात सोमवारी मोठा स्फोट झाला. स्फोटात दोन रशियन व्यक्तींचा समावेश असून या घटनेत २० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर किती जण जखमी झाले आहेत, याची संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही, अशी माहिती रशियन वृत्तसंस्था स्पुतनिकने दिली आहे. तालिबानच्या राजवाटीत बॉम्बस्फोट ही एख सामान्य बाब असली तरी या घटनेत मृत्यू आणि जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – मुंबई महापालिका निवडणूक भाजपा-शिंदे गट एकत्र लढणार! शाहांकडून 150 जागांचे टार्गेट)

शुक्रवारी हेरात प्रांतातील मशिदीला हादरवून सोडणाऱ्या स्फोटात ठार झालेल्या लोकांमध्ये एका मुख्य अफगाण धर्मगुरूचा समावेश होता. मशिदीमध्ये शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी हा स्फोट झाला असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या महिन्याच्या सुरूवातीला, एका मशिदीत मोठा स्फोट झाला. यावेळी किमान २१ लोक ठार झाले असून ३० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी ऑगस्टदरम्यान, तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर देशात पाठोपाठ बॉम्बस्फोट होत आहेत. हे उल्लेखनीय आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्या कारकीर्दीत देशात मृतांची संख्या जास्त होती. परंतु त्यांच्या राजवटीत स्फोटांची संख्या कमी होती. तालिबानच्या राजवटीत राजधानी बॉम्बस्फोट होणे ही एक नवी बाब बनली असल्याचे अहवालात म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.