धक्कादायक खुलासा; शीझानच्या नादी लागून तुनिषा हिजाब घालू लागलेली

100

तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर आता विविध खुलासे बाहेर येऊ लागले आहेत. त्यातील आणखी एक धक्कादायक खुलासा स्वतः तुनिषाच्या आईने केला आहे. तुनिषाच्या आईने तिला सांगितले की, शीझानच्या नादी लागून  तुनिषा उर्दू बोलू लागली आणि ती तिच्या कुटुंबापासून दूर गेली.

 तुनिषाही उर्दूमध्ये बोलू लागली  

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी तुनिषाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन निष्पक्ष तपास आणि न्याय देण्याचे आश्वासन दिले. जर शीझान दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये असेल तर त्याने तुनिषाला सत्य सांगायला हवे होते. शीझानचे कुटुंब तुनिषा आणि तिच्या कुटुंबाला ब्लॅकमेल करत होते. तुनिषाला उर्दू प्रशिक्षण दिले जात असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. तुनिषाही उर्दूमध्ये बोलू लागली होती. तुनिषाचे काका पवन शर्मा यांनीही या प्रकरणात लव्ह जिहादचा संशय व्यक्त केला आहे. अलीकडेच त्याने म्हटले होते की, शीझानशी मैत्री केल्यानंतर तुनिशा हिजाब घालू लागली.

(हेही वाचा संधी असूनही शरद पवारांनी अजित पवारांना मुख्यमंत्री केले नाही; फडणवीसांचा टोला)

शीझानचे अनेक मुलींशी संबंध होते  

तुनिषाने 24 डिसेंबर 2022 रोजी तिच्या टीव्ही शो “अली बाबा: दास्तान-ए-काबुल” च्या सेटवर आत्महत्या केली होती, त्यानंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली शीजानला पोलिसांनी अटक केली होती. मृत अभिनेत्री तुनिषा शर्माच्या कुटुंबीयांनी शीजानला फसवणूक करणारा म्हटले आहे. तुनिषाच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, शीझानचे अनेक मुलींशी संबंध होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.