मुंबईच्या डबेवाल्यांची सावरकर स्मारकाला भेट; वीर सावरकरांचे व्यक्तिमत्त्व समजून घेताना भारावले

110

जगभर ओळख बनलेले मुंबईचे डबेवाले मुंबईसाठी आदर्श आहेत. दक्षिण मुंबईत दररोज नोकरीनिमित्ताने मुंबईच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या नोकरदार वर्गाला घरचे गरमागरम जेवण पोहचवण्याचे नियोजनबद्ध काम डबेवाले करत असतात. त्यामुळेच इंग्लंडच्या राजाकडून त्यांना शाबासकी मिळाली. मुंबईचे हेच डबेवाले बुधवार, २८ डिसेंबर रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात पोहोचले. मुंबईतील डबेवाल्यांच्या संघटनेच्या कार्यकारिणीच्या शिष्टमंडळाने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली. त्यावेळी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास कथन करणारा लाईट अँड साऊंड शो पाहून डबेवाले भारावून गेले.

dabbewala1

लाईट अँड साऊंड शो अप्रतिम

स्मारकाच्या वतीने सुरु केलेला लाईट अँड साऊंड शो अप्रतिम असून तो प्रत्येक व्यक्तीने आवर्जून पहावा आणि आपल्या मुलांनाही दाखवावा, अशा भावना डबेवाले संघटनेने व्यक्त केल्या. डबेवाले संघटनेचे प्रवक्ते आणि आंबोली गावचे सरपंच विष्णू काळडोके यांनी फेसबुक पोस्ट लिहून सावरकर स्मारकाच्या भेटीचे वर्णन केले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात वीर सावरकर आणि असंख्य क्रांतिकारकांनी स्वतःचे आयुष्य त्यागले. हे पाहून मुंबईच्या डबेवाल्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्यांनी स्मारकाचे कार्य समजावून घेतले, तसेच वीर सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू समजून घेतले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समितीच्या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी निवृत्त पोलीस महासंचालक प्रविण दीक्षित, कार्याध्यक्ष पदी रणजित सावरकर, कोषाध्यक्ष पदी मंजिरी मराठे, कार्यवाहपदी राजेंद्र वराडकर आणि सह कार्यवाह पदी स्वप्नील सावरकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल डबेवाला संघटनेने त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी डबेवाले संघटनेचे आभार मानून शिष्टमंडळास स्वलिखित स्वातंत्र्यवीर सावरकर हे चरित्र पुस्तक भेट दिले.

(हेही वाचा Pathan Film; सेन्सॉर बोर्डाने भगव्या रंगांचा अवमान केलेल्या गाण्यासंबंधी दिले आदेश )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.