Marathi Suvichar : सुविचार मनाला देतो आधार; हे सुविचार वाचून तुमचा दिवस आनंदात घालवा!

मराठीत अनेक सुविचार आहेत. आज आम्ही तुम्हाला असे काही मराठी सुविचार सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात खूप छान होईल.

253
Suvichar Marathi : सुविचार मनाला देतो आधार; हे सुविचार वाचून तुमचा दिवस आनंदात घालवा!

शालेय जीवनापासून आपल्या आयुष्यात सुविचार (Suvichar Marathi) प्रवेश करतात. फळ्यावर लिहिलेला सुविचार वाचून आपल्या मनावर नकळत संस्कार होत असतात. जसजसे आपण मोठे होतो, तसतसे हे संस्काराचे धागे सैल होत जातात आणि बाहेरच्या जगात प्रवेश केल्यानंतर जबाबदारीच्या ओझ्याखाली आपण दबून जातो.

(हेही वाचा – Rohit Hardik Hug : रोहित हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी सज्ज, सरावाच्या वेळी दोघांनी दिलं आलिंगन)

म्हणून मोठं झाल्यानंतरही संस्कार आणि सुविचारांची (Suvichar Marathi) नितांत आवश्यकता असते. मराठीत अनेक सुविचार आहेत. आज आम्ही तुम्हाला असे काही मराठी सुविचार (Suvichar Marathi) सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात खूप छान होईल.

(हेही वाचा – World Poetry Day : २१ मार्च रोजी जागतिक कविता दिन का साजरा केला जातो?)

वाचा मराठी सुविचार (Suvichar Marathi)

१. माणसाला किती आयुष्य मिळणार आहे, कधी मृत्यू येणार आहे हा नशिबाचा भाग असतो. पण लोकांच्या मनामध्ये जिवंत राहणे हा कर्माचा भाग असतो.

२. चांगले विचार, चांगली भावना आणि चांगले आचरण हीच आयुष्याची खरी संपत्ती आहे.

३. ज्ञानी, सद्गुणी व्यक्ती दुसऱ्या कोणाशीही कोणत्याही बाबतीत स्पर्धा करायला जात नाही.

४. दृष्टिकोन हा मनाचा आरसा आहे तो नेहमी विचारच परावर्तीत करतो.

५. आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो, त्याला कुणीही हरवू शकत नाही .

६. पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर, स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.

(हेही वाचा – PM Narendra Modi : आजच्या अस्थिर, अशांत आणि संक्रमणाच्या युगात लोकशाहीसमोर अनेक आव्हाने)

७. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य!

८. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा, अपयशी होण्याच्या भितीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे.

९. भरलेला खिसा हा माणसाला नेहमी दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

१०. आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.

११. खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या अधिक जवळ आलो आहोत.

१२. कारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कारणं सांगत नाहीत.

१३. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागवणे जास्त श्रेष्ठ.

१४. माणसाला दोनंच गोष्टी हुशार बनवतात. एक म्हणजे वाचलेली पुस्तके आणि दुसरी भेटलेली माणसे.

१५. देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखं दिलंय, फक्त एक अट घातलीये, जो झिजेल तोच चमकेल.

१६. ऋणानुबंधाची फुले कधीच कोमेजत नसतात, तर आठवणींच्या सुगंधाने ती सदा दरवळत राहतात.

१७. ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत, त्या नष्ट करण्याचा अधिकार आपल्याला नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.