Super Blue Moon 2023 : आज मनोहारी चंद्रबिंबाचे दर्शन नक्की घ्या, कारण आहे खास…

116
Super Blue Moon 2023 : आज मनोहारी चंद्रबिंबाचे दर्शन नक्की घ्या, कारण आहे खास...
Super Blue Moon 2023 : आज मनोहारी चंद्रबिंबाचे दर्शन नक्की घ्या, कारण आहे खास...

यावेळचे रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमा ही खास आहे कारण आज सुपरमून सह ब्लू मून (Super Blue Moon 2023) देखील दिसणार आहे. आजच्या चंद्रबिंब हे नेहमी पेक्षा थोड्या वेगळ्या रंगात दिसणार आहे. त्यापैकी चंद्र आपल्या जवळ असल्याने फुल मून, सुपर मून, न्यू मून आणि ब्लू मून, ब्लड मून चंद्रग्रहण अशा वेगवेगळ्या घटना दर वर्षी किंवा दोन-तीन वर्षातून एकदा पाहायला मिळतात. ब्लू मून ही देखील अशाच खगोलीय घटनांपैकी आहे. आज 30 ऑगस्टच्या पौर्णमेला हे ब्लू मून दिसणार आहे.

(हेही पहा – Maharashtra Politics : महाराष्ट्रात राजकारणाचा पारा तापला…)

यावर्षी ऑगस्ट महिन्यात 2 पौर्णिमा आल्या आहेत. त्यापैकी ३० ऑगस्टला येणारी पौर्णिमा ही दुसरी पौर्णिमा आहे. त्यामुळे या पौर्णिमेला ब्लू मून दिसणार आहे. सप्टेंबर महिन्यातील पौर्णिमेला सुपरमून दिसणार असले, तरी ते या आजच्या 30 ऑगस्टच्या पौर्णिमेपेक्षा थोडे लहान असणार आहे. तसेच ते फक्त सूपरमून असेल ब्लू मून नसणार आहे. त्यामुळे आज रात्रीचा चंद्र वर्षातील सर्वात मोठा आणि सर्वात चमकदार चंद्र असेल, त्यामुळे आज चंद्राचे आज मनोहारी दर्शन घ्यावे, असे आवाहन अनेक खगोलशास्त्रज्ञ करत आहेत. ३० ऑगस्टच्या रात्री ८ वाजून ३७ मिनिटे रोजी ब्लू मून सर्वात जास्त चमकदार असेल. यानंतर तीन वर्षांनी २०२६ मध्ये ब्लू मून पाहिला जाऊ शकेल. (Super Blue Moon 2023)

ब्लू मून दिसणार आहे, म्हणजे चंद्राचा नेहमीचा प्रकाश हा सूर्यापासून बदललेला पांढरा प्रकाश असतो. परंतू जेव्हा मार्गात एखादी गोष्ट असेल जी लाल प्रकाशाला रोखते, अशा वेळी चंद्र निळा देखील दिसू शकतो. मात्र, हे खूपच दुर्मिळ असून असे ज्वालामुखीच्या विस्फोटानंतर होऊ शकते. त्यामुळे ब्लू मून हे नाव असले तरी चंद्र निळ्या रंगाचा दिसेलच असे नाही. मात्र या प्रकाशाचा रंग नेहमी पेक्षा थोडा वेगळा असतो.

विशेष खगोलीय घटना

पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आलेला असतो. या वेळी चंद्र हा नेहमीपेक्षा १४ पट अधिक मोठा दिसतो. तसेच चंद्राचा प्रकाशदेखील या दिवशी अधिक असतो. दरवर्षी ठराविक काळात चंद्र हा पृथ्वीच्या अधिकाधिक जवळ येत असतो. त्यामुळे चंद्र नेहमीपेक्षा मोठा दिसतो. ही एक विशेष खगोलीय घटना असते. या वर्षी ऑगस्ट महिन्यातील दोन्ही पौर्णिमा असणार आहेत. चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर एका ठराविक मर्यादेत कमी जास्त होत राहते. सामान्यपणे हे अंतर पृथ्वीपासून ३.६० किलोमीटर ते ४ लाख किलोमीटर इतके अंतर असते. या वर्षी जुलै मध्ये 2-३ तारखेला आणि १ ऑगस्टला चंद्र अगदी जवळून दिसला होता. २-३ तारखेच्या सुपरमूनच्या वेळी चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर ३ लाख ६१ हजार 934 किलोमीटर इतके होते. त्या वेळी चंद्र पृथ्वीपासून ३ लाख ५७ हजार ५३० किमी इतक्या अंतरावर होता.

28-29 सप्टेंबरला येणाऱ्या पौर्णिमेला पुन्हा सुपरमून दिसणार

जुलैमध्ये आणि 1 ऑगस्टला दिसलेल्या सुपरमून पेक्षा आजच्या राखी पौर्णिमेचा चंद्र हा आणखी जास्त मोठा आणि सुंदर असणार आहे. कारण गेल्या दोन्ही वेळे पेक्षा चंद्र पृथ्वीच्या आणखी जवळ असणार आहे. 30 ऑगस्टला चंद्र ३ लाख ५७ हजार ३४४ किमी अंतरावर असणार आहे. तर पुढील महिन्यात 28-29 सप्टेंबरला येणाऱ्या पौर्णिमेला पुन्हा सुपरमून दिसणार आहे. मात्र, त्यावेळी चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर ३ लाख ६१ हजार ५५२ किमी असणार आहे. त्यामुळे 30 ऑगस्टचा राखी पौर्णिमेच्या दिवशी दिसणारे सूपरमून सर्वात मोठे आणि सूंदर असणार आहे. तसेच यावेळी भारताने राबवलेली चांद्र मोहीम याच काळात राबवली. जेणेकरून चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने कमी कालावधीत चांद्रयानाला चंद्रावर पाठवता येईल. सध्या चंद्रयान 3 ने पाठवलेले विक्रम लँडर आणि रोव्हर हे चंद्राच्या दक्षिण ध्रुव शिवशक्ती पॉइंटवर आहे. (Super Blue Moon 2023)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.