Bengaluru Bicycle Theft : तरुणपणी चोरलेली सायकल, ६०व्या वर्षी झाली अटक

बंगळुरू शहरात पोलिसांनी अलीकडेच एका ६० वर्षीय पाशा जान नावाच्या माणसाला अटक केली.

153
Bengaluru Bicycle Theft : तरुणपणी चोरलेली सायकल, ६०व्या वर्षी झाली अटक
Bengaluru Bicycle Theft : तरुणपणी चोरलेली सायकल, ६०व्या वर्षी झाली अटक
  • ऋजुता लुकतुके

एका तरुणाने २२ व्या वर्षी केलेली चोरी त्याला ६०व्या वर्षी महागात पडली. बंगळुरू पोलिसांनी तपास सुरूच ठेवला आणि चोराला ६०व्या अटक केली. पाहूया ही थरारक कहाणी. बंगळुरू शहरात पोलिसांनी अलीकडेच एका ६० वर्षीय पाशा जान नावाच्या माणसाला अटक केली. पूर्व बंगळुरूच्या के आर पुरम भागात राहणारा हा इसम सायकल चोर आहे असा पोलिसांचा अंदाज होता. पण, विशेष म्हणजे त्याने केलेली चोरी तब्बल ३८ वर्षं जुनी होती.

पाशा जानने तो २२ वर्षांचा असताना १९८५ मध्ये आपल्या गावातील एक सायकल चोरली होती. त्या काळी वाहतुकीचं साधन म्हणून सायकलीला महत्त्व होतं. कोलार फिल्ड्‌स भागात सायकलच्या मालकाने पोलिसांत तक्रारही दिली होती. आणि या तक्रारीवरून पोलिसांनी तेव्हाच पाशा जानला एकदा अटकही केली होती. पण, काही दिवसांनी कोर्टाने त्याला जामीन दिला. आता ३८ वर्षांनंतर त्याच पाशा जानला बंगळुरू शहर पोलिसांनी त्याच गुन्ह्यावरून अटक केली आहे. आता पाशा जानचं वय ६० वर्षं आहे. आणि तो उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवतो. सायकल चोरीच्या प्रकरणात जामिनावर सुटल्यावर पाशा जान गाव सोडून बंगळुरू शहरात आला होता. आणि मधल्या काळात म्हणजे १९८५ पासून पोलिसांनी त्याच्या नावाने २०० च्या वर अटक वॉरंट काढली. पण, तो गाव सोडून गेल्यामुळे पोलिसांना सापडू शकला नाही.

पण, म्हणतात ना, तुमच्या चुकीचं प्रायश्चित्त याच जन्मात तुम्हाला घ्यावं लागतं, तसं पाशा जानच्या बाबतीत घडलं. कोल फिल्ड्स पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांनी जुन्या फाईलचा निपटारा करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यात सायकल चोरीच्या या गुन्ह्याची फाईल, गुन्हेगार फरार या सदराखाली प्रलंबित होती. गुन्हेगार माहीत होता. त्यामुळे पोलिसांना त्याचा शोध पुन्हा सुरू केला. जुलै महिन्यात स्थानिक पोलीस ठाण्यात मंजुनाथ एल उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले. आणि त्यांनी ही केस पुन्हा उघडली. ‘पोलीस ठाण्यातील ही सगळ्यात जुनी केस होती. आरोपी फरार असल्यामुळे फाईल बंद करता येत नव्हती. आरोपीच्या नातेवाईकांचा शोध घेऊन या केसच्या मूळापर्यंत जायचं मी ठरवलं,’ मंजुनाथ यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं. टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.

(हेही वाचा – Municipal license : शासनाच्या पारपत्र विभाग आणि आयकर विभागाच्या धर्तीवर)

मंजुनाथ यांनी पाशा जानला पकडण्यासाठी तीन जणांचा एक चमू नेमला. या तिघांनी जानच्या नातेवाईकांवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. आणि त्यांच्याकडून शिताफीने पाशा जानची माहिती मिळवली. काही महिन्यांनंतर त्याच्या एका नातेवाईकाने तो के आर पुरम इथं राहत असल्याचं सांगितलं. पोलिसांनी लगेच बंगळुरूमध्ये पाशा जानच्या घरी जाऊन त्याला गाठलं. आधी ती व्यक्ती म्हणजे आपण नसल्याचं त्याने सांगितलं. पण, त्याच्या बोटाचे ठसे आधीच्या आरोपीच्या ठशांशी जुळल्यामुळे पोलिसांनी अखेर त्याला अटक केली. अशाप्रकारे १९८५मध्ये घडलेल्या गुन्ह्यातील आरोपी ३८ वर्षांनी पकडला गेला. पण, तोपर्यंत तो व्यक्ती ६० वर्षांचा झाला होता. आता कोर्टात खटला पुन्हा उभा राहील.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.