वीर सावरकरांविषयी आक्षेपार्ह लेखन करणाऱ्या सुधीर गावड यांनी मागितली माफी

सुधीर गावड याने ज्या अश्लाघ्य शब्दांचा वापर करून वीर सावरकर यांचा अवमान केला, त्याचे पुरावे पाहून माहिम पोलिसांनी भा.दं.सं. कलम ५०५ (२) अंतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल केला होता.

116
वीर सावरकरांविषयी आक्षेपार्ह लेखन करणाऱ्या सुधीर गावड यांनी मागितली माफी

क्रांतिकारकांचे प्रेरणास्रोत असलेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी समाजमाध्यमामध्ये आक्षेपार्ह लेखन करणाऱ्या सुधीर गावड यांनी माफी मागितली आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत गावड यांनी, यापुढे असे कृत्य करणार नसल्याची शपथही घेतली आहे.

वीर सावरकरांविषयी आक्षेपार्ह लेखन करणाऱ्या सुधीर गावड यांच्या विरोधात त्वरित गुन्हा दाखल करण्याची मागणी ज्ञानदा प्रबोधन संस्थेचे पदाधिकारी आणि सावरकर प्रेमी प्रशांत पळ, नितिन येंडे, राज दुदवडकर, मनोज म्हामुणकर, योगेश सारंगुळ, ॲड. भक्ति जोगल, भास्कर देवाडिगा, राजेश पवार यांनी माहिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर शिरसाट यांच्याकडे केली होती. सुधीर गावड याने ज्या अश्लाघ्य शब्दांचा वापर करून वीर सावरकर यांचा अवमान केला, त्याचे पुरावे पाहून माहिम पोलिसांनी भा.दं.सं. कलम ५०५ (२) अंतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल केला होता.

(हेही वाचा – उद्धव ठाकरेंचा वाढदिवस ‘देशद्रोही दिन’ म्हणून साजरा करा – नितेश राणे)

मात्र, आपली चूक लक्षात येताच सुधीर गावड यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात येऊन माफी मागितली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत गावड यांनी यापुढे असे कृत्य करणार नसल्याची शपथ घेतली. तसेच चुकीच्या माहितीच्या आधारे इतरांनीही असे लेखन न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

नेमका प्रकार काय ?

सावरकरप्रेमी प्रशांत पळ यांनी वीर सावरकर यांच्याविषयी पोस्ट टाकली होती, सुधीर गावड याने त्यावर कमेंट करताना अतिशय अश्लाघ्य शब्दांत प्रतिक्रिया लिहिली. त्यावर सावरकर प्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त करीत पोलिसांत तक्रार दाखल केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी केलेला त्याग खूप मोठा आहे. अशा महान क्रांतिकारकाबद्दल असे लिखाण करणे हे योग्य नाही, असे पोलीस अधिकारी यावेळी म्हणाले. न्यायव्यवस्थेकडून परवानगी घेऊन सुधीर गावड यांच्यावर कारवाई करणार असल्याची ग्वाही यावेळी पोलिसांनी दिली. त्यानुसार गावडविरोधात भा.दं.सं. कलम ५०५ (२) अंतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.