हा सुरा एक दिवस तुझ्या गळ्यापर्यंत पोहचावा! सोशल मीडियातून पंतप्रधान मोदींना धमकी

135

राजस्थानच्या उदयपूरमधील धानमंडी परिसरात असलेल्या मालदास रोडवर तिघांनी एका तरुणाची गळा चिरून हत्या केली. दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येमुळे परिसरात खळबळ माजली. हत्येची माहिती मिळताच धानमंडी आणि घंटाघर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला आणि मृतदेह एम.बी. रुग्णालयात ठेवला.

कन्हैयालालच्या हत्येनंतर हल्लेखोरांकडून व्हिडीओ जारी 

मृत कन्हैयालालच्या ८ वर्षांच्या मुलाने त्याच्या मोबाईलवरून नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट टाकली. त्यामुळे काही जण नाराज झाले. तीन आरोपींनी धारदार हत्यारांनी कन्हैयालालची हत्या केली. या घटनेमुळे हिंदू संघटनांमध्ये आक्रोश आहे. कन्हैयालालच्या हत्येनंतर हल्लेखोरांनी एक व्हिडीओ जारी केला. यात त्यांनी धारदार चाकू दाखवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नुपूर शर्मा यांची हत्या करण्याची धमकी त्यांनी दिली. ‘उदयपूरमधील दुकानदाराचे शीर धडावेगळे करण्यात आले आहे. ए नरेंद्र मोदी, आग तू लावली आहेस आणि आम्ही ती विझवू. मी प्रार्थना करतो की एक दिवस हा सुरा तुझ्या गळ्यापर्यंत पोहोचावा. आता उदयपूरातील लोकांनी एकच नारा द्यावा. आता चुकीची एकच शिक्षा, शीर धडावेगळं,’ असे आरोपींनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करून उदयपूरमधील निर्घृण हत्येचा निषेध केला आहे. या घटनेत सहभागी असलेल्या आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाईल. पोलीस घटनेचा खोलात जाऊन तपास करतील. सगळ्यांनी शांतता राखावी, असे आवाहन गेहलोत यांनी केले आहे.

(हेही वाचा ओएनजीसीच्या कामगारांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले, ४ जणांचा मृत्यू)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.