Samsung : सॅमसंगकडून बेस्‍ट सुपर ऑफर, ६००० एमएएच बॅटरी असलेला गॅलॅक्‍सी एफ१५ ५जी लाँच

684
Samsung : सॅमसंगकडून बेस्‍ट सुपर ऑफर, ६००० एमएएच बॅटरी असलेला गॅलॅक्‍सी एफ१५ ५जी लाँच
Samsung : सॅमसंगकडून बेस्‍ट सुपर ऑफर, ६००० एमएएच बॅटरी असलेला गॅलॅक्‍सी एफ१५ ५जी लाँच

ग्राहक बँक कॅशबॅक किंवा १००० रूपयांचा अपग्रेड बोनस मिळवू शकतात. यासह गॅलॅक्‍सी (Samsung) एफ१५ ५जी ची निव्‍वळ सुरूवातीची किंमत ४ जीबी + १२८ जीबी व्‍हेरिएण्‍टसाठी ११९९९ रूपये आणि ६ जीबी + १२८ जीबी व्‍हेरिएण्‍टसाठी १३४९९ रूपये असेल

गुरूग्राम, भारत – मार्च ४, २०२४ – सॅमसंग  (Samsung) या भारतातील सर्वात मोठ्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रॅण्‍डने गॅलॅक्‍सी एफ१५ ५जी च्‍या लाँचची घोषणा केली, जो वापरकर्त्‍यांना विविध सेगमेंट-ओन्‍ली वैशिष्‍ट्यांसह उच्‍च दर्जाचा स्‍मार्टफोन अनुभव देतो, ज्‍यामुळे हा स्‍मार्टफोन त्‍याच्‍या पूर्वीच्‍या डिवाईसेसपेक्षा वरचढ ठरतो. गॅलॅक्‍सी एफ१५ ५जी सेगमेंट बेस्‍ट ६००० एमएएच बॅटरी आणि इतर सेगमेंट-ओन्‍ली वैशिष्‍ट्ये जसे सुपर एएमओएलईडी डिस्‍प्‍ले, अँड्रॉईड अपग्रेड्सचे चार जनरेशन्‍स आणि पाच वर्षांचे सिक्‍युरिटी अपडेट्स यासह इतरांपेक्षा वरचढ ठरतो, ज्‍यामधून वापरकर्ते नवीन वैशिष्‍ट्ये आणि दीर्घकाळासाठी सुधारित सुरक्षिततेचा आनंद घेऊ शकतात. (Samsung)

”आमचा पहिला २०२४ गॅलॅक्‍सी एफ सिरीज स्‍मार्टफोन गॅलॅक्‍सी एफ१५ ५जी सह आम्‍ही शक्तिशाली डिवाईसेसच्‍या माध्‍यमातून ग्राहकांचे जीवन सक्षम करण्‍याप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ करत आहोत. गॅलॅक्‍सी एफ१५ ५जी च्‍या लाँचमधून अर्थपूर्ण नाविन्‍यतेप्रती आमची अविरत समर्पितता दिसून येते, ज्‍यामुळे वापरकर्ते त्‍यांच्‍या संपूर्ण क्षमता अनलॉक करू शकतात,” असे सॅमसंग (Samsung) इंडियाच्‍या एमएक्‍स बिझनेसचे उपाध्‍यक्ष आदित्‍य बाबर म्‍हणाले.
ते पुढे म्‍हणाले, ”सुपर एएमओएलईडी डिस्‍प्‍लेसोबत विविध सेगमेंट-ओन्‍ली वैशिष्‍ट्ये, अँड्रॉईड अपग्रेड्सच्‍या चार जनरेशन्‍सप्रती आमची कटिबद्धता आणि पाच वर्षांचे सिक्‍युरिटी अपग्रेड्स व सेगमेंट-बेस्‍ट ६००० एमएएच बॅटरी यांसह आम्‍ही वापरकर्त्‍यांना, विशेषत: गतीशील जीवनशैली असलेल्‍या जनरेशन झेडला गॅलॅक्‍सी एफ१५ ५जी च्‍या माध्‍यमातून धमाल अनुभव देत आहोत.” (Samsung)

(हेही वाचा- PM Narendra Modi : राज्यांच्या विकासाच्या माध्यमातून देशाचा विकास संकल्पनेसह पुढील वाटचाल)

डिझाइन व डिस्‍प्‍ले

गॅलॅक्‍सी एफ१५ ५जी मध्‍ये प्रिमिअम सिग्‍नेचर गॅलॅक्‍सी लुक आहे, जे आकर्षकता व अत्‍याधुनिकतेला नव्‍या उंचीवर घेऊन जाते. गॅलॅक्‍सी एफ१५ ५जी मध्‍ये सर्वोत्तम व्‍युईंग अनुभवासाठी सेगमेंट-ओन्‍ली ६.५ इंच सुपर एएमओएलईडी डिस्‍प्‍ले आहे. सुपर एएमओएलईडी डिस्‍प्‍लेसह विशेषत: प्रखर सुर्यप्रकाशात तंत्रज्ञान-प्रेमी जनरेशन झेड आणि मिलेनियम ग्राहकांना सोशल मीडिया फिड्स स्‍क्रोल करणे सोपे जाते. अॅश ब्‍लॅक, ग्रूव्‍ही व्‍हायोलेट आणि जॅझी ग्रीन या आकर्षक रंगांमध्‍ये उपलब्‍ध असलेला गॅलॅक्‍सी एफ१५ ५जी प्रत्‍येक स्‍टाइलशी जुळणाऱ्या रंगांचा पर्याय देतो. (Samsung)

बॅटरी

गॅलॅक्‍सी एफ१५ ५जी मध्‍ये सेगमेंट-बेस्‍ट ६००० एमएएच बॅटरी आहे, जी स्‍मार्टफोनला जवळपास दोन दिवसांपर्यंत कार्यरत ठेवू शकते, ज्‍यामुळे वापरकर्ते त्‍यांच्‍या पसंतीच्या मनोरंजनाचा मनमुराद आनंद घेऊ शकतात. तसेच, २५ वॅट सुपर-फास्‍ट चार्जिंग वैशिष्‍ट्यामधून डिवाईस त्‍वरित चार्ज होण्‍याची खात्री मिळते, ज्‍यामुळे वापरकर्ते दिवसभर कनेक्‍टेड व उत्‍पादनक्षम राहू शकतात. (Samsung)

(हेही वाचा- मुंबईतील स्ट्रीट फूडचा आनंद घ्यायचा आहे? या 7 ठिकाणांला नक्की भेट द्या)

प्रोसेसर

प्रभावी सेगमेंट-ओन्‍ली वैशिष्‍ट्यांसह गॅलॅक्‍सी एफ१५ ५जी मध्‍ये मीडियाटेक डायमेन्सिटी ६१००+ चिपसेटची शक्‍ती आहे, जिच्‍यामध्‍ये आव्‍हानात्‍मक टास्‍क्‍सची सहजपणे हाताळणी करण्‍याची क्षमता आहे. तसेच, या स्‍मार्टफोनमध्‍ये रॅम प्‍लस वैशिष्‍ट्य आहे, जे जवळपास १२ जीबीपर्यंत अतिरिक्त व्‍हर्च्‍युअल रॅम देते. यामधून सुलभपणे अॅप कार्यरत राहण्‍याची खात्री मिळते आणि वापरकर्त्‍यांसाठी डिवाईसच्‍या मल्‍टीटास्किंग क्षमतांमध्‍ये वाढ होते. (Samsung)

कॅमेरा

गॅलॅक्‍सी एफ१५ ५जी मध्‍ये ५० मेगापिक्‍सल कॅमेरा सेटअपसह व्हिडिओ डिजिटल इमेज स्‍टेबिलायझेशन (व्‍हीडीआयएस) आहे, जे अस्थिरता किंवा हालचालींमुळे व्हिडिओजमध्‍ये येणारे ब्‍लर किंवा व्‍यत्‍यय कमी करते. गॅलॅक्‍सी एफ१५ ५जी मध्‍ये आकर्षक व सुस्‍पष्‍ट सेल्‍फीज कॅप्‍चर करण्‍यासाठी १३ मेगापिक्‍सल फ्रण्‍ट कॅमेरा देखील आहे. (Samsung)

(हेही वाचा- JP Nadda Resigns: जे पी नड्डा यांनी दिला राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा, कारण? वाचा सविस्तर…)

गॅलॅक्‍सी एक्‍स्‍पेरिअन्‍सेस

गॅलॅक्‍सी एफ१५ ५जी वॉईस फोकस अशा नाविन्‍यपूर्ण वैशिष्‍ट्यांसह ग्राहकांच्‍या स्‍मार्टफोन वापराच्‍या अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जातो. वॉईस फोकस वैशिष्‍ट्य कॉलिंगदरम्‍यान सुस्‍पष्‍टपणे ऐकू येण्‍यासाठी आसपासचा आवाज कमी करते. गॅलॅक्‍सी एफ१५ ५जी अनेक उत्‍साहवर्धक वैशिष्‍ट्ये आहेत, जी गॅलॅक्‍सी एक्‍स्‍पेरिअन्‍स उत्‍साहित करतात. क्विक शेअर वैशिष्‍ट्य वापरकर्त्‍यांना ते दूर असले तरी इतर कोणत्‍याही डिवाईससोबत, तसेच लॅपटॉप व टॅबसोबत त्‍वरित फाइल्‍स, फोटोज व डॉक्‍यूमेंट्स शेअर करण्‍यास सक्षम करते. तसेच, गॅलॅक्‍सी एफ१५ ५जी मध्‍ये स्‍मार्ट हॉटस्‍पॉट वैशिष्‍ट्य आहे, जे शेअर्ड कनेक्‍टीव्‍हीटी सुलभ करते. डिवाईसमध्‍ये नॉक्‍स व्‍हॉल्‍ट चिपसेट देखील आहे, जी चिप लेव्‍हलवर निर्माण करण्‍यात आली आहे, तुमचे संवेदनशील डेटा जसे पिन, पासवर्ड्स व पॅटर्न्‍सच्‍या संरक्षणासाठी आणि सॉफ्टवेअर व हार्डवेअर धोक्‍यांपासून संरक्षणासाठी स्वतंत्र टेम्‍पर-रेसिस्‍टण्‍ट स्‍टोरेजमध्‍ये डिझाइन करण्‍यात आली आहे. (Samsung)

(हेही वाचा- Shambhuraj Desai : ठाणे जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड उभारा! पालकमंत्री शंभुराज देसाई यांची सूचना)

फ्यूचर रेडी

सेगमेंटमध्‍ये आणखी एक पहिला स्‍मार्टफोन गॅलॅक्‍सी एफ१५ ५जी मध्‍ये अँड्रॉईड अपग्रेड्सचे चार जनरेशन्‍स आणि पाच वर्षांचे सिक्‍युरिटी अपडेट्स असतील, ज्‍यामधून वापरकर्ते नवीन वैशिष्‍ट्यांचा आणि दीर्घकाळापर्यंत सुधारित सुरक्षिततेचा आनंद घेऊ शकण्‍याची खात्री मिळते.

मेमरी व्‍हेरिएण्‍ट्स, किंमत, उपलब्‍धता आणि ऑफर्स

अॅश ब्‍लॅक, ग्रूव्‍ही व्‍हायोलेट आणि जॅझी ग्रीन या तीन आकर्षक रंगांमध्‍ये उपलब्‍ध असलेला गॅलॅक्‍सी एफ१५ ५जी ४ जीबी + १२८ जीबी आणि ६ जीबी + १२८ जीबी स्‍टोरेज व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये येतो. हा स्‍मार्टफोन ११ मार्चपासून फ्लिपकार्ट, Samsung.com वर आणि निवडक रिटेल स्‍टोअर्समध्‍ये उपलब्‍ध असेल.
पहिल्‍यांदाच आज ४ मार्च सायंकाळी ७ वाजल्‍यापासून फ्लिपकार्टवर गॅलॅक्‍सी एफ१५ ५जी साठी अर्ली सेल सुरू होणार आहे. अर्ली सेलमध्‍ये गॅलॅक्‍सी एफ१५ ५जी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना १२९९ रूपये किंमत असलेला सॅमसंग ट्रव्‍हल अॅडप्‍टर फक्‍त २९९ रूपयांमध्‍ये मिळेल.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.