PM Narendra Modi : राज्यांच्या विकासाच्या माध्यमातून देशाचा विकास संकल्पनेसह पुढील वाटचाल

केंद्र सरकार आणि तेलंगणा राज्य निर्मिती या दोघांच्याही कार्यकाळाला १० वर्षे पूर्ण होत आहेत याकडे निर्देश करून पंतप्रधान मोदी म्हणाले की या राज्यातील जनतेची स्वप्ने साकार करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

139
BJP : पंतप्रधान मोदी आणि भाजपाकडून महाशिवरात्रीनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा, सोशल मिडिया 'X'द्वारे दिला संदेश
BJP : पंतप्रधान मोदी आणि भाजपाकडून महाशिवरात्रीनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा, सोशल मिडिया 'X'द्वारे दिला संदेश

राज्यांच्या विकासाच्या माध्यमातून देशाचा विकास या संकल्पनेसह आम्ही पुढील वाटचाल करत आहोत, असे (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच सुधारलेल्या अर्थव्यवस्थेमुळे जगाचा देशावरील विश्वास वाढतो आणि त्यातून राज्यांकडे गुंतवणूक आकर्षित होत असल्यामुळे त्यांना देखील याचा फायदा होत असल्याचे ते म्हणाले.

(हेही वाचा – Swatantryaveer Savarkar : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट प्रोपोगंडा नाही; चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताना काय म्हणाले रणदीप हुड्डा?)

विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन :

तेलंगणामधील आदिलाबाद येथे पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उर्जा, रेल्वे तसेच रस्ते या क्षेत्रांशी संबंधित ५६,००० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण तसेच पायाभरणी करण्यात आली. तेलंगणाचे राज्यपाल डॉ.सुंदरराजन, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी तसेच केंद्रीय मंत्री जी.किशन रेड्डी यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?

याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान (PM Narendra Modi) म्हणाले की आदिलाबादच्या भूमीला केवळ तेलंगणाशीच नव्हे तर संपूर्ण देशाशी संबंधित विकासप्रकल्पांचे साक्षीदार होण्याची संधी मिळत आहे कारण आज ५६ हजार कोटी रुपये खर्चाच्या ३० हून अधिक विकास प्रकल्पांचे आज लोकार्पण तरी होत आहे किंवा त्यांची पायाभरणी होत आहे. विद्युतनिर्मिती, पर्यावरणविषयक शाश्वतता तसेच रस्त्यांची सुविधा निर्माण करणे यांच्याशी संबंधित अनेक प्रकल्पांचा यात समावेश आहे असे त्यांनी सांगितले.

(हेही वाचा – BMC : रमाकांत बिरादार यांचे पुनर्वसन अखेर परिमंडळ सहाच्या उपायुक्तपदी)

जनतेची स्वप्ने साकार करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे :

केंद्र सरकार आणि तेलंगणा राज्य निर्मिती या दोघांच्याही कार्यकाळाला १० वर्षे पूर्ण होत आहेत याकडे निर्देश करून (PM Narendra Modi) पंतप्रधान मोदी म्हणाले की या राज्यातील जनतेची स्वप्ने साकार करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आज देखील ८०० मेगावॉट क्षमतेच्या एनटीपीसी युनिट २ चे उद्घाटन करण्यात आले असून या प्रकल्पामुळे तेलंगणाच्या विद्युतनिर्मिती क्षमतेमध्ये अधिक भर पडणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. अंबारी-आदिलाबाद-पिंपळखुटी या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून आदिलाबाद, बेला आणि मुळूगूया भागातील दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी झाली आहे याचा देखील त्यांनी उल्लेख केला. हे रेल्वे आणि रस्ते प्रकल्प तेलंगणाच्या तसेच या संपूर्ण क्षेत्राच्या विकासाला चालना देतील आणि प्रवासाचा वेळ वाचवून, पर्यटनाला चालना देत असंख्य रोजगार संधी निर्माण करतील ही बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली. (PM Narendra Modi)

भारत लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल :

गेल्या तिमाहीत ८.४ टक्क्यांची वाढ दाखवणारी भारत ही एकमेव प्रमुख अर्थव्यवस्था असल्याने भारतीय अर्थव्यवस्थेच्या उच्च विकास दराबाबत संपूर्ण जगात कुतुहल निर्माण झाले आहे याचा त्यांनी उल्लेख केला. “या वेगाने, भारत लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल,” असे (PM Narendra Modi) पंतप्रधान म्हणाले. याचा अर्थ असा देखील होतो की तेलंगणाची अर्थव्यवस्था देखील उच्च विकासदरासह प्रगती करेल असे त्यांनी पुढे सांगितले.

(हेही वाचा – Narendra Modi: रूबी ते रामवाडी मेट्रो मार्गाचे बुधवारी पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन)

योजनांच्या अंमलबजावणीवर अधिक भर दिला जाईल :

तेलंगणासारख्या भागांकडे पूर्वी दुर्लक्ष झाले होते याचे स्मरण करत, पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) गेल्या दशकातील प्रशासनाच्या नव्या मार्गांवर अधिक भर दिला. गेल्या १० वर्षांत तेलंगणाच्या विकासासाठी अधिक निधीची तरतूद करून दिल्याकडे उपस्थितांचे लक्ष वेधत ते म्हणाले, “आमच्याकरिता विकास म्हणजे सर्वात गरीब व्यक्तीचा विकास, दलित, आदिवासी, मागासलेले आणि वंचित यांचा विकास.” देशातील २५ कोटींहून अधिक नागरिक दारिद्रयरेषेच्या बाहेर पडले असे सांगून पंतप्रधानांनी याचे श्रेय गरिबांसाठी सरकारने राबवलेल्या कल्याणकारी योजनांना दिले. येत्या ५ वर्षांच्या काळात अशा प्रकारच्या योजनांच्या अंमलबजावणीवर अधिक भर दिला जाईल यावर पंतप्रधानांनी भर दिला. (PM Narendra Modi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.