Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धासाठी मुंबईसह इतर शहरांतून मानवी तस्करी, CBIकडून १० ठिकाणी छापेमारी; युद्धात अडकलेल्या व्यक्तिंची सुटका होण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाचा पुढाकार

मिळालेल्या माहितीनुसार, अफसानप्रमाणेच तेलंगणा आणि भारतातील इतर ठिकाणच्या अनेक तरुणांना रशियामध्ये मोठ्या पगारावर नोकरी देण्याचे आश्वासन देऊन एजंटांद्वारे परदेशात पाठवले होते.

157
Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धासाठी मुंबईसह इतर शहरांतून मानवी तस्करी, CBIकडून १० ठिकाणी छापेमारी; युद्धात अडकलेल्या व्यक्तिंची सुटका होण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाचा पुढाकार
Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धासाठी मुंबईसह इतर शहरांतून मानवी तस्करी, CBIकडून १० ठिकाणी छापेमारी; युद्धात अडकलेल्या व्यक्तिंची सुटका होण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाचा पुढाकार

रशिया-युक्रेन युद्धामध्ये (Russia-Ukraine War) मोठ्या प्रमाणावर मानवी तस्करी होत असल्याची बाब समोर आली आहे. सीबीआयकडून मुंबईसह दिल्ली, पंजाब, चंदीगड परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. या प्रकरणी सीबीआयकडून अनेक व्हिजा कन्सल्टन्सी आणि एजंट विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केंद्रीय एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (७ मार्च) ही माहिती दिली. एजन्सीने ७ शहरांमध्ये १० हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, एजन्सीने अनेक व्हिसा सल्लागार कंपन्या आणि एजंट्सविरुद्ध एफआयआर दाखल केले आहेत. झडतीदरम्यान अनेकांना ताब्यात घेण्यात आले असून ५० लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

सीबीआयचे छापे…
सीबीआयने दिल्ली, तिरुअनंतपुरम, मुंबई, अंबाला, चंदीगड, मदुराई आणि चेन्नई येथे छापे टाकले आहेत. युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धात हैदराबाद येथील मोहम्मद अफसान या ३० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या एका दिवसानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. अफसानला मदतनीस म्हणून काम करण्यासाठी परदेशात नेण्यात आले, त्यानंतर त्याला युद्धात सामील करण्यात आले. सुमारे आठवडाभरापूर्वी गुजरातमधील सुरत येथील हमिल मांगुकिया नावाचा व्यक्तीही युद्धात मारला गेला होता.

(हेही वाचा – Human Trafficking Racket : युट्युबच्या माध्यमातून चालवले जाणारे मानवी तस्करीचे रॅकेट CBI कडून उध्वस्त, ७ राज्यात सर्च ऑपरेशन)

तरुणांना युक्रेन युद्धात लढायला पाठवले
मिळालेल्या माहितीनुसार, अफसानप्रमाणेच तेलंगणा आणि भारतातील इतर ठिकाणच्या अनेक तरुणांना रशियामध्ये मोठ्या पगारावर नोकरी देण्याचे आश्वासन देऊन एजंटांद्वारे परदेशात पाठवले होते. एजंटने त्यांच्याकडून प्रति व्यक्ती साडेतीन लाख रुपये वसूल केल्याचा आरोप आहे. नंतर त्यांना युक्रेन युद्धात लढण्यासाठी पाठवण्यात आले.

परराष्ट्र मंत्रालयाने घेतला पुढाकार
युद्धात अडकलेल्या या व्यक्तींची लवकर सुटका व्हावी यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने रशियन अधिकाऱ्यांकडेही हे प्रकरण उचलून धरले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने असेही म्हटले होते की, सुमारे 20 भारतीय अजूनही रशियामध्ये अडकले आहेत आणि त्यांना परत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.