New Womens Policy: राज्याच्या नव्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात, कसा होणार फायदा; वाचा सविस्तर

209
New Womens Policy: राज्याच्या नव्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात, कसा होणार फायदा; वाचा सविस्तर
New Womens Policy: राज्याच्या नव्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात, कसा होणार फायदा; वाचा सविस्तर

राज्यात शुक्रवारपासून (New Womens Policy) (८ मार्च) नवे महिला धोरण लागू होणार आहे. या नव्या धोरणाच्या अंमलबजावणीची सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी गुरुवारी दिली.

गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या राज्याच्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारला अखेर मुहूर्त मिळाला आहे. महिला दिनाचे औचित्य साधून, शुक्रवारपासून या नव्या धोरणाच्या अंमलबजावणीस सुरुवात होत आहे, असे अदिती तटकरे यांनी सांगितले.

(हेही वाचा – S Jaishankar On China : शेजारी लिखित करारांचे उल्लंघन करतात; एस. जयशंकर यांनी चीनला सुनावले खडे बोल)

राज्याच्या चौथ्या महिला धोरणाची घोषणा
यावेळी अदिती तटकरे यांनी राज्याच्या चौथ्या महिला धोरणाची घोषणा केली. त्या म्हणाल्या, महिला धोरण अष्टसूत्रीवर आधारित असून, त्यात प्रामुख्याने महिलांच्या आरोग्य व पोषण आहारावर लक्ष्य केंद्रित करण्यात आले आहे. दुर्गम आणि पोहोचण्यास कठीण अशा शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागांत मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यावरही भर देण्यात येणार आहे. शिवाय शिक्षण, कौशल्यासाठी माध्यमिक आणि वरिष्ठ पातळीवरील शाळांमध्ये १०० टक्के नोंदणी होईल आणि ती टिकून राहील, यासाठी लक्ष देण्याची सूचना करण्यात आली आहे.

कौशल्य विकास योजनेअंतर्गत महिलांसाठी विशेष कार्यक्रम
त्याबरोबरच कौशल्य विकास योजनेअंतर्गत महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. महिलांविरोधातील सर्व प्रकारच्या हिंसाचारास आळा घालण्यासाठी सर्व संस्थांमध्ये लैंगिक छळ प्रतिबंधक अतंर्गत समितीची स्थापना करण्याची सूचना करण्यात आली आहे. निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधींसाठी नेतृत्व, नियोजन, अर्थसंकल्प आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्याची सूचना धोरणात करण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.